घरदेश-विदेशजगातील सर्वाधिक भारतीयांसोबत झाली सायबर फसवणूक; मायक्रोसॉफ्ट रिसर्च अहवालातून स्पष्ट

जगातील सर्वाधिक भारतीयांसोबत झाली सायबर फसवणूक; मायक्रोसॉफ्ट रिसर्च अहवालातून स्पष्ट

Subscribe

जगभरात सायबर घोटाळ्यांमधून पैसे गमावलेल्या लोकांपैकी सर्वाधिक संख्या भारतीयांमध्ये जास्त आहे. सायबर घोटाळ्यांमधून एक तृतीयांश भारतीयांनी आपले पैसे गमावले आहेत. मायक्रोसॉफ्टच्या ‘ग्लोबल टेक सपोर्ट स्कॅम रिसर्च’ अहवालात ही बाब समोर उघड झाली आहे. करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, 2018 च्या 14 टक्के तुलनेत 2021 मध्ये 31 टक्के भारतीयांनी जास्त पैसे गमावले. 2018 मध्ये जागतिक सरासरी 6 टक्के होती, जी 2021 मध्ये वाढून 7 टक्के इतकी झाली आहे. भारतानंतर सायबर घोटाळ्यांमधून अमेरिका, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलियामधील बऱ्याच लोकांची फसवणूक झाली आहे.

भारतात फोन घोटाळ्यांच्या प्रकरणात वाढ

भारतात सायबर क्राईमसह फोन घोटाळ्यांच्या प्रकरणात देखील वाढ झाली आहेत. करण्यात आलेल्या संशोधन अहवालानुसार सन 2021 मध्ये 51 टक्के लोकांना मोबाइलवर पॉप-अप विंडोज किंवा जाहिराती मिळाल्यात. यापैकी 48 टक्के लोकांनी या फसव्या जाहिरातींवर क्लिक केले आणि ते वेबसाइटवर रीडायरेक्ट झाले. या व्यतिरिक्त, 42 टक्के भारतीयांना फसवणूकीची ईमेल देखील आले. तर 31 टक्के भारतीयांना फसवणूकीचे कॉल आले होते जे 2018 मध्ये 23 टक्के भारतीयांना रिसिव्ह केले आणि या फसवणूकीला बळी पडले.

- Advertisement -

भविष्यात अधिक सायबर हल्ले होण्याची शक्यता

या सर्वेक्षणात असे स्पष्ट झाले की, 2021 मध्ये 47 टक्के लोक मोठ्या प्रमाणात फसव्या कॉल्सवर अवलंबून राहून ते त्यावर विश्वास ठेवू शकतात. त्यामुळे भविष्यात देखील अशा प्रकारचे सायबर फसवणूकीचे हल्ले अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  सन 2018 मध्ये ही संख्या 32 टक्के होती. त्यात आता वाढल्याचे समोर आले आहे. हे सर्वेक्षण जगातील 16 देशांमधील 16,254 प्रौढ इंटरनेट युजर्सवर 6-17 मे 2021 दरम्यान करण्यात आले होते. या सर्वेक्षणावरून जगातील सर्वाधिक भारतीयांसोबत सायबर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -