घरताज्या घडामोडीराजस्थानात हवाईदलाचे मिग-21 लडाऊ विमान कोसळले; 2 पायलटचा मृत्यू

राजस्थानात हवाईदलाचे मिग-21 लडाऊ विमान कोसळले; 2 पायलटचा मृत्यू

Subscribe

हवाईदलाचे मिग-21 लडाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना राजस्थानात घडली आहे. या लडाऊ विमानाच्या अपघातात २ वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारासव ही दुर्घटना घडली.

हवाईदलाचे मिग-21 लडाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना राजस्थानात घडली आहे. या लडाऊ विमानाच्या अपघातात २ वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारासव ही दुर्घटना घडली. विमानाच्या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली आहे.

पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा थरार व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात अपघातानंतर विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे दिसत आहे. जमिनीवर पायलटचा मृतदेहही दिसत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बारमेरमध्ये हा अपघात झाला आहे. बैतू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमडा येथे जोरदार स्फोट होऊन विमान पडले. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पोलिस-प्रशासनाला याबाबत माहिती दिली. मिग विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटरवर पसरला आहे. लडाऊ विमान कोसळल्यानंतर विमानाचे तुकडे झाले असून सर्वत्र आगीचे लोळ पसरले आहेत.

गतवर्षी 24 डिसेंबर रोजी देखील भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानमधील जैसलमेरजवळ कोसळले होते. या अपघातात पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात मध्य प्रदेशात एफआयआर दाखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -