घर देश-विदेश भारतीय हवाईदलाचे 'मिग - 29' विमान गोव्यात कोसळले; वैमानिक सुखरूप

भारतीय हवाईदलाचे ‘मिग – 29’ विमान गोव्यात कोसळले; वैमानिक सुखरूप

Subscribe

गोव्याजवळ भारतीय वायू दलाच्या 'मिग - 29' या विमानाला अपघात झाला आहे.

भारतीय हवाई दलाचे ‘मिग – 29’ हे हे फायटर जेट क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. भारतीय हवाई दलाच्या या फायटर जेटचा गोव्याजवळ अपघात झाला आहे. दरंयान हे विमान क्रॅश होण्यापूर्वीच विमानाच्या पायलटने विमानातून स्वतःची सुटका करून जीव वाचवला ही दिलासादायक बाब आहे. पायलटने विमानातून उडी मारत स्वतःचा जीव वाचवला. पायलटची स्थिती सुद्धा सध्या स्थिर आहे. (MiG-29 aircraft of Indian Air Force Fighter Jet crashed in Goa)

गोव्याजवळ भारतीय वायू दलाच्या ‘मिग – 29’ या विमानाला अपघात झाला आहे. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नियमित उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे आणि हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच ही अपघाताची घटना घडली. तसेच या विमान अपघाताप्रकरणी वायू दलाने चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सुद्धा मिळत आहे.

- Advertisement -

दरम्यान 2004 आणि 2010 मध्ये भारताने रशियाकडून एकूण 45 MiG-29K विमानांची खरेदी केली होती. 23 जून 2011 रोजी एक रशियन मिग-29K ट्रेनर विमान क्रॅश होऊन दोन्ही वैमानिक ठार झाले होते. त्यानंतर या विमानाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते.


- Advertisement -

हे ही वाचा – नोंदणी रद्द झालेली असतानाही समता पार्टीचा ‘मशाल’ चिन्हासाठी दावा, ठाकरेंची भूमिका काय?

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -