घरताज्या घडामोडीभारतीय नौदलाचं 'मिग-२९ के' विमान अरबी समुद्रात कोसळलं, एक पायलट बेपत्ता!

भारतीय नौदलाचं ‘मिग-२९ के’ विमान अरबी समुद्रात कोसळलं, एक पायलट बेपत्ता!

Subscribe

भारतीय नौदलाचं ‘मिग-२९ के’ (MiG-29K Trainer Aircraft) विमान काल (गुरुवारी) अरबी समुद्रात कोसळलं. माहितीनुसार, काल संध्याकाळी ५च्या सुमारास हे विमानं कोसळलं आहे. या दुर्घटनेत एक वैमानिक सुखरुप असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

गोव्याच्या जवळ भारतीय नौदलाचं ‘मिग-२९ के’ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. यामधील एका वैमानिकाला वाचवण्यात हवाई दलाला यश आलं असून दुसरा वैमानिक बेपत्ता झाला आहे. त्यामुळे सध्या शोध कार्य सुरू आहे. या दुर्घटनेच नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही आहे. त्यामुळे नौदलाने ही दुर्घटना कशी घडली यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

आयएनएस विक्रम आदित्यचं हे एक एअर क्राफ्ट होत. गोव्यामध्ये हे क्राफ्ट तैनात होत. उड्डाण झाल्यानंतर ‘मिग २६ के’ विमानाची दुर्घटना झाली. गेल्या १ वर्षामध्ये तिसऱ्यांदा मिग विमानाची दुर्घटना घडली आहे. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला ‘मिग २९’ विमानाचा अपघात झाला. त्यावेळी वैमानिकांना सुखरुप वाचवण्यात आले होते. या घटनेच्या तीन महिन्यांतच म्हणजेच फ्रेबुवारी महिन्यात भारतीय नौदलाचे ‘मिग २९के’ या विमानाचा पुन्हा एकदा अपघात झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरात: कोविड रुग्णालयात अग्नितांडव, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -