Lockdown: भुकेल्या मजुरांनी शेवटी खायला घेतली स्मशानभूमीजवळची केळी!

देशाची राजधानी दिल्लीमध्ये तर मजुरांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

देशात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पण या सगळ्यात हाल होत आहेत ते हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये तर मजुरांचे सर्वाधिक हाल होत आहेत. दिल्लीमधील कश्मिरी गेट जवळ दररोज हजारो मजुर रात्रीच्या निवाऱ्यासाठी येतात. पण सध्याचं दृश्य बघून कोणाचही मन हेलावेल. कारण हे मजूर सध्या यमुना घाटी टाकलेल्या केळ्यांच्या ढिगात एखादं केळं खाण्या लायक आहे का, ज्यामुळे त््यांची एका रात्रीची तरी सोय होईल.ृ

या विषयी एक मजुर म्हणाला, खायला मिळत नाहीये, त्यामुळे आज केळचं खाणार आहोत. जुन्या दिल्लीमध्ये मजुरी करत होते. पण लॉकडाऊनमुळे सगळं बंद झालं. रहायला जागा नाही. खायला अन्न नाही. रस्त्यावर गेलो तर पोलिस मारतात. म्हणून आम्ही यमुनेच्या किनारी जाऊन राहिलो आहोत. दोन दिवस झाले खायला मिळाले नाही. आता इथेच अडकून पडलो आहोत.  निगमबोध घाटापासून ते मजनू टीळे पर्यंत हजारो प्रवासी मजुर तुम्हाला दिसतील.

सध्या हजारो मजुर या यमुना किनाऱ्यावर आहेत पण मिडीयामध्ये ज्या प्रमाणे बातम्या येऊ लागल्या त्याप्रमाणे दिल्ली सरकारने या मजुरांना एका शाळेत हलवायला सुरूवात केली.

इथे हजारो मजुर आहेत. आम्ही त्यांना शाळेमध्ये घेऊन जात आहोत. शाळेचे शेल्टर होममध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. अशी माहिती विपिन रॉय यांनी दिली. ही गोष्ट केवळ दिल्लीतील नाही पण जवळजवळ प्रत्येक राज्यात मजुरांची सध्या हीच स्थिती आहे.


हे ही वाचा – पोटात अन्नाचा कण नाही…८ दिवसाच्या बाळाला कसं जगवू? एका हतबल आईची व्यथा!