खोदकाम करणाऱ्या मजुराचे नशीब फळफळले; खाणीत सापडला कोट्यवधीचा हिरा

miner digs out 442 carat diamond worth rs 135 crore
खोदकाम करणाऱ्या मजुराचे नशीब फळफळले; खाणीत सापडला कोट्यावधीचा हिरा

खाणीत हिरा सापडला आणि आपण कोट्याधीश झालो असं स्वप्न बऱ्याच जणांना पडत मात्र, एका मजूराचे हे स्वप्न सत्यात उतरल आहे. हिऱ्यांच्या खाणीत काम करणाऱ्या एका मजुराचे नशीब चांगलेच चमकले आहे. कारण त्याच्या हाती कोट्यवधी रुपयांचा हिरा लागला आहे. हा मजूर Lesothos च्या Letseng खाणीत काम करत होता. जेम डायमंड लिमिटेडने हा हिरा ४४२ कॅरेट असल्याचे सांगितले तसेच याची किंमतही कोट्यवधी असल्याची चर्चा आहे.

बीएमओ कॅपिटल मार्केच्या अॅनालिस्टनुसार; हा ४४२ कॅरेटचा हिरा साधारण १३५ कोटी रुपयांना मार्केटमध्ये विकला जाऊ शकतो. गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, Letsent येथील हिऱ्याची खाण ही हिऱ्याच्या आकारासाठी आणि गुणवत्तेसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे या खाणीतून निघणाऱ्या हिऱ्यांना परदेशात मोठी किंमत दिली जाते.

दरम्यान, खोदकाम करत असताना गृहस्थाला अनोखा दगड सापडला असून या गृहस्थाने तब्बल १४.७ कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीच्या हाती असाच एक दगड लागला होता. तो दगड विकून या गृहस्थाने २३.५ कोटी रुपये मिळवले होते. या दगडाचे वजन ६.३ किलो आहे.

कोण आहे हा मजुर

डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार; दोनवेळा कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या गृहस्थाचे नाव सॅनिनिऊ लॅजेर आहे. सॅनिनिऊ लॅजेर हा टांझानियाचा रहिवासी आहे. त्याठिकाणच्या खाणीत खोदकाम करण्याचे काम करतात. या व्यक्तीचे ५० वर्षे असून त्यांना तब्बल ३० मुले आहेत. विशेष म्हणजे या रक्कमेतून शाळा आणि शॉपिंग मॉल्स तयार करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा – बापरे! समोस्यामध्ये सापडली साबणाची वडी, डॉक्टरांच्या कँटीनमधील घटना