घरताज्या घडामोडीLive Updates: मुंबईत गेल्या २४ तासात ९,९८९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Live Updates: मुंबईत गेल्या २४ तासात ९,९८९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासात ६३,२९४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद


मुंबईत गेल्या २४ तासात ९,९८९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, ५८ रुग्णांचा मृत्यू (सविस्तर वाचा)

- Advertisement -

14 दिवसांचा लॉकडाऊन लावा टास्क फोर्स, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्ण लॉकडाऊनच्या बाजूने, ८ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विचार


भारत सरकारने रेमेडिसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्स सोबत बैठक सुरु, लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता


खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा कोरोनामुळे रद्द

राज्यामध्ये पसरत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी यंदा खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची १२ एप्रिल रोजी होणार होती. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्याने या अशा प्रकारच्या यात्रा, उत्सव साजरे करण्यावर बंधनं घालण्यात आले आहेत.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना काल (शनिवार) मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान राज ठाकरे यांच्या कमरेजवळच्या स्नायूवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना आज (रविवार) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे यांचे कुटुंबिय रुग्णालयात उपस्थितीत होते. काल दुपारी ३च्या सुमारास राज ठाकरे यांच्या कमरेजवळील स्नायूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. विनोद अग्रवाल आणि डॉ. आनंद उत्तुरे यांनी ही शस्त्रक्रिया केली.


भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचे कोरोनाने निधन

भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचे गुजरात वापी येथे कोरोनाने निधन झाले आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ४ एप्रिल रोजी वापी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या ८ दिवसापासून वरखंडे हे कोरोनाशी आपली झुंज देत होते. मात्र त्यांची कोरोनाशी सुरु असलेली झुंज संपली.


देशात कोरोनाचा कहर कायम! देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.


जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये एक १४ वर्षाचा अल्पवयीन देखील सहभागी होता. शोपियानमधील हे ऑपरेश संपले आहे. तर, दुसरीकडे अनंतनागच्या बिजबेहरामध्येही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. तिथे अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळतेय.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कडक निर्बंध असून चालणार नाही तर कोरोनाचा संसर्ग आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय कोणताही पर्याय नाही, असे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार आहेत, त्यानंतर याबद्दल निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.


शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे निधन

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. माजी महापौर विनायक पांडे यांच्या त्या वहिनी होत्या. कल्पना पांडे या प्रभाग क्रमांक २४ चे प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडणून आल्या होत्या. त्यांचे पती चंद्रकांत पांडे यांनी एकदा या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम केले. पालिकेतील काही समित्यांवर त्यांनी काम केले. महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या पांडे यांची प्रभागातील विकास कामे आणि मतदारांशी राखलेला जनसंपर्क यावर भिस्त होती. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांचे महापालिकेतील काम अतिशय आक्रमक होते. (सविस्तर वाचा)


मुंबईतील शिवाजी पार्क दादर परिसरातील विकेंड लॉकडाऊनची दृश्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -