मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार असल्याचे समोर येत आहे. यावेळी लॉकडाऊनची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.


कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारतात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. लस संबंधातील तज्ज्ञ समितीनं रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला मंजुरी दिल्यानंतर आता ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ अर्थात ‘डीसीजीआय’कडून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’कडून देण्यात आली आहे. ‘डीसीजीआय’ने सोमवारी रात्री उशिरा कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.


विचारवंत लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झाले. कोरोना संसर्गाशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आठ दिवसांपूर्वी साथीदार यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान गेली पाच दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वीरा साथीदार यांनी १९ मार्चला करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. मात्र १० दिवसानंतर ते करोना संक्रमित झाले. आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


सुशिल चंद्रा यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार घेतला असून त्यांनी सुनिल अरोरा यांची जागा घेतली


वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांपासून ऑक्सिजनचाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णालयातील उपचार घेत आलेल्या रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. सोमवारी या परिसरात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असणाऱ्या ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत्यू हे ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यावर सोमवारीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती.