घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात गेल्या २४ तासात ५८,९५२ कोरोनाबाधितांची नोंद

Live Update: राज्यात गेल्या २४ तासात ५८,९५२ कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

आज ३९,६२४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २९,०५,७२१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) .२१ एवढे झाले आहे.

आज राज्यात ५८,९५२ नवीन रुग्णांचे निदान.

- Advertisement -

राज्यात आज २७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .


मुंबईत गेल्या २४ तासात ९९२५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

#CoronavirusUpdates
१४ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता

२४ तासात बाधित रुग्ण -९९२५

२४ तासात बरे झालेले रुग्ण-९२७३
बरे झालेले एकूण रुग्ण- ४,४४,२१४
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८१%

एकूण सक्रिय रुग्ण-८७,४४३

दुप्पटीचा दर- ४० दिवस
कोविड वाढीचा दर (७ एप्रिल-१३ एप्रिल)- १.७१%#NaToCorona

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 14, 2021


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची साडे तास तासाच्या चौकशी नंतर सीबीआयच्या तावडीतून सुटका

सर्व आरोप तथ्यहीन आणि चूकीचे असल्याचा देशमुखांचा दावा


कलम १४४ लागू असताना ५ पेक्षा अधिक जणांना फिरण्यास मनाई

नागरिकांनी विनाकरण लाठीमार करण्याची वेळ न आणण्याचे आवाहन – पोलीस महासंचालक

जनतेने सहकार्य करावे, दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पासची आवश्यकता नाही – पोलीस महासंचालक


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयात देखील कोरोनाचा संसर्ग पसरला असून त्यांचे मुख्य सचिव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मोठ्या संख्येने आयएएस अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवले होते. दरम्यान, त्यांनी कोरोनाची टेस्ट केली असून या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती योगी यांनी ट्वीट करून दिली आहे. यासह योगींनी त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपली कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले असून काळजी घेण्यास सांगितले आहे.


आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील सर्व नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.


सातारा, सोलापूरात अवकाळी पावसाचा फटका

सोलापूरात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतामध्ये असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात द्राक्ष, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ज्वारी, गहू ,कडबा यांचे नुकसान झाले आहे तर
सातारा जिल्हयात अवकाळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका बसला असून शेतकऱी चिंता व्यक्त करत आहे.


देशात गेल्या २४ तासात १ लाख ८४ हजाराहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चैत्यभूमी स्मारक येथे अभिवादन केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व मान्यवर यांनीही अभिवादन केले.


वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये एका रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी आणले होते, त्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. ही माहिती डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना दिली. मात्र रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केली. या रूग्णाला हिंगणघाटचे डॉक्टर निर्मेश कोठारी यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी कागदपत्रांवरुन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगताच, रुग्णाच्या एका नातेवाईकाने डॉक्टरांना मारहाण केली. डॉक्टरांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बुधवार १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १४४ कायदा लागू करत राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली असून अत्यावश्यक कारण नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -