घर देश-विदेश टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपीची बायको बनणार पाकिस्तानमध्ये मंत्री; कोण 'ती' महिला वाचा-

टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपीची बायको बनणार पाकिस्तानमध्ये मंत्री; कोण ‘ती’ महिला वाचा-

Subscribe

यासिन मलिकची पत्नी मुशाल ही सतत पाकिस्तानी नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे पती निर्दोष असल्याचे सांगून त्याला वाचवण्यासाठी धडपडत असते. मात्र तिच्या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही.

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. अशातच आता पाकिस्तानमध्ये राजकीय उलाढाली सुरू असून, शहबाज शरिफ यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून, आता अनवर उल हक काकर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पाकिस्तानची काळजी वाहत आहेत. दरम्यान काश्मीरमधील फुटीरतावादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात तुरुंगामध्ये असलेला यासिन मलिक याची पत्नी पाकिस्तानमध्ये मंत्री होणार असल्याची माहिती पुढे आली असून, यासिनची पत्नी मुशाल हुसैनकडे मंत्रिपद येणार आहे. (Minister in Pakistan to become wife of accused in terror funding case Who is that woman Read)

यासिन मलिकची पत्नी मुशाल ही सतत पाकिस्तानी नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे पती निर्दोष असल्याचे सांगून त्याला वाचवण्यासाठी धडपडत असते. मात्र तिच्या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही. टेरर फंडिंग प्रकरणात भारतीय तुरुंगात असलेला यासिन मलिकच्या पत्नीला थेट अन्वर उल हक यांच्या 18 सदस्यीय मंत्रीमंडळात समावेश होण्याची ऑफर आल्याने यासिन मलिकीचे पाकिस्तान आणि तेथील दहशतवाद्यांशी असलेले संबंध पुन्हा एकदा अधोरेखीत करणारे असेच आहेत.

पंतप्रधानांची मानवाधिकार विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती

- Advertisement -

पाकिस्तानमधील प्रमुख दैनिकापैकी एक असलेल्या डॉनच्या वृत्तानुसार, सध्या पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान असलेले अनवर उल हक यांनी मुशाल मलिकचा 18 सदस्यीय मंत्री मंडळात समावेश केला असून, पंतप्रधानांची मानवाधिकार विषयक सल्लागार म्हणून तिची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. मुशाल मलिक मूळ पाकिस्तानची रहिवासी आहे हे विशेष.

हेही वाचा : मध्यप्रदेश – छत्तीसगड निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

तज्ज्ञ कुटूंबातील आहे मुशाल मलिक

- Advertisement -

मुशाल हुसैन (मलिक) ही मूळची पाकिस्तानची आहे. तिचे वडील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ होते. तर आईकडे मुस्लीम लीगच्या महिला विंगचे सरचिटणीस पद होते. तर तिचा भाऊ हैदर अली मल्की अमेरिकेमध्ये परराष्ट्र धोणाचा अभ्यासक आहे.

हेही वाचा : Mallikarjun Kharge : राहुल – सोनिया गांधी यांनी मला काँग्रेस अध्यक्ष केले; खर्गेच्या वक्तव्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

यामुळे आहे यासिन मलिक कारागृहात

मागच्या वर्षी २४ मे रोजी एनआयए कोर्टाने यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मलिकला ट्रायल कोर्टाने टेरर फंडिंगच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोन वेगवेगळ्या प्रकरणात यासिन मलिकला शिक्षा झालेली आहे. याशिवाय त्याला पाच वेगवेगळ्या खटल्यांमध्ये 10-10 वर्षे आणि तीन वेगवेगळ्या प्रकरणात 5-5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -