अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर केंद्राचं नियंत्रण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Minister mansukh mandviya union government has no control over the prices of essential medicines
अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर केंद्राचं नियंत्रण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देशातील अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही असे स्पष्ट केले आहे. देशात औषधांच्या किमती वाढणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः माहिती दिली आहे. सरकारने कोणत्याही अत्यावश्यक औषधांच्या किमतींमध्ये वाढवल्या नाहीत. भारतात अत्यावश्यक असणाऱ्या औषधांच्या किमतींवर केंद्र सरकार नियंत्रण ठेवत नाही असे देखील आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देशातील आरोग्य व्यवस्थेविषयी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी देशातील अत्यावश्यक औषधांवर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही असे सांगितले आहे. केंद्र सरकार कोणत्याही अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ करत नाही. अत्यावश्यक औषधांची किमत ही घाऊक निर्देशांकाशी जोडलेली असते. जर WPI वाढला तर किमती वाढतात आणि जर कमी असेल तर किमतींमध्ये घट होतो. मात्र केंद्र सरकार यावर नियंत्रण ठेवत नाही असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

देशातील केमिस्ट दुकानांचे नियमित सर्वेक्षण ड्रग कंट्रोलर जनरल इंडिया आणि NPPA द्वारे २२ राजे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थापन केलेल्या किंमती मॉनिटरिंग आणि रिसोर्स युनिट्सच्या अधिकाऱ्यांद्वारे केले जाते. जेव्हा राज्य औषध नियंत्रकांद्वारे औषधांची टंचाईची नोंद केली जाते. अन्यथा ही बाब एनपीपीएच्या निदर्शनास येते तेव्हा उत्पादकांवर औषधांचा साठा तुटवड्याच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतात. देशात औषधांचा तुटवडा असल्याची कोणतीही माहिती सध्या एनपीपीए कडून आली नाही.

काही रुपयांनी औषधांची वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे की, काही अत्यावश्यक औषधांच्या दरामध्ये घाऊक निर्देशांकाशी संबंधित वाढ होत आहे. या दरात चढ-उतार पाहायला मिळतो. वाढ झालेल्या औषधांच्या किमती या काही रुपयांमध्ये आहेत. वाढ झाली नाही जर वाढ झाली तर काही रुपयांची असेल. औषधांच्या किमती वाढवण्यात केंद्र सरकारची कोणती भूमिका नाही असे मनसुख मांडवीय म्हणाले आहेत.


हेही वाचा : भारताची रशियाकडे तेलावर सवलत देण्याची मागणी; आगामी काळात तेल खरेदी होईल स्वस्त?