केंद्रीय राज्यमंत्री फग्गज सिंह कुलस्ते यांचा प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. गुरूवारी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत केंद्रीय राज्यमंत्री एका ठिकाणी कामानिमित्त जात असताना वाटेत भाजलेला मका खाण्यासाठी थांबले. मका विकत घेताना त्यांनी विक्रेत्याला भाजलेल्या मक्याची किंमत विचारली. विक्रेत्याने किंमत सांगितली तेव्हा ते किंमत ऐकूण आश्चर्यचकित झाले.
आज सिवनी से मंडला जाते हुए। स्थानीय भुट्टे का स्वाद लिया। हम सभी को अपने स्थानीय किसानों और छोटे दुकानदारों से खाद्य वस्तुओं को ख़रीदना चाहिए। जिससे उनको रोज़गार और हमको मिलावट रहित वस्तुएँ मिलेंगी। @MoRD_GoI @BJP4Mandla @BJP4MP pic.twitter.com/aNsLP2JOdU
— Faggan Singh Kulaste (@fskulaste) July 21, 2022
केंद्रीय राज्यमंत्री फग्गज सिंह कुलस्ते यांनी या व्हिडीओ स्वताः आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “आज सिवनीतून मंडला येथे जात असताना, तेथील स्थानिक विक्रेत्याच्या भाजलेल्या मक्याचा आस्वाद घेतला. आपण सर्वांनीच शेतकऱ्यांकडून आणि छोट्या दुकानदारांकडून खाद्य पदार्थ खरेदी करायला हवे. ज्यातून त्यांना रोजगार आणि आपल्याला चांगल्या वस्तू उपलब्ध होतील.” असं त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलेलं आहे. मात्र यामध्ये त्यांनी मक्याची वाढलेली किंमतीचा कोणताही मुद्दा लिहिलेला नाही, पण व्हिडीओमध्ये ही गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकायला येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये काय म्हणाले राज्यमंत्री फग्गज सिंह कुलस्ते
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मंत्री साहेब गाडीतून खाली उतरून भाजलेला मका द्यायला सांगतात. त्यावेळी ते विक्रेत्याला मक्याची किंमत विचारतात तेव्हा तो एका मक्याची किंमत १५ रूपये असल्याचे सांगतो. ही किंमत ऐकूण मंत्री साहेब विक्रेत्याला म्हणतात की, मका इतका महाग देतास? मका तर फ्री मध्ये भेटतो. यावर विक्रेता म्हणतो ५ रूपये तर मका खरेदी करण्यासाठी जातात. त्यानंतर मंत्री साहेब त्या विक्रेत्याला त्याचं नाव विचारतात आणि पैसे देऊन निघून जातात.