घरCORONA UPDATE'बेल्ट से ठोकना जानती हूँ, सुली पर चढा दूंगी', केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्याला...

‘बेल्ट से ठोकना जानती हूँ, सुली पर चढा दूंगी’, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्याला सुनावलं!

Subscribe

देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना अनेक ठिकाणी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये लोकांना नीट वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेकांनी केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन टिकेच्या केंद्रस्थानी आहे. छत्तीसगडमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला होता. सरगुजामधल्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या एका तरूणाने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल केला होता. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपच्या छत्तीसगडमधील खासदार रेणुका सिंह संबंधित क्वॉरंटाईन सेंटरवर पोहोचल्या आणि त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला चांगलाच दम भरला. याचा देखील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये रेणुका सिंह या अधिकाऱ्याला ‘बेल्ट से ठोकना जानती हूँ, सुली पर चढा दूंगी’, अशा शब्दांत दम भरताच या अधिकाऱ्याची बोलतीच बंद झाली. मात्र, अशा प्रकारे खुलेआम एका सरकारी अधिकाऱ्याला धमकी दिल्यामुळे रेणुका सिंह वादात सापडल्या आहेत.

जर माझ्या भागात असा प्रकार घडला तर…!

बलरामपुर जिल्ह्यातल्या एका वसतीगृहात बनवण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरला रेणुका सिंह यांनी भेट दिली होती. यावेळी मारहाण केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल झालेल्या तरुणाला त्या भेटल्या. त्या तरुणाच्या कुटुंबियांनी तिथले सीईओ आणि तहसिलदार यांनी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप केला होता. यावर तपास करताना रेणुका सिंह अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. ‘तो मुलगा मारहाण झाल्याची तक्रार करतोय. इतक्या दिवसांनंतर देखील त्याच्या पाठीवर मारहाणीचे वळ आहेत. तरी तुम्ही म्हणताय असं काहीही घडलेलं नाही. जर माझ्या मतदारसंघात असा प्रकार घडला, तर तुम्हाला अंधाऱ्या खोलीत नेऊन बेल्टने ठोकून काढीन. थेट सुळावर चढवीन’, असा दम रेणुका चौधरी यांनी भरला.

- Advertisement -

या प्रकारानंतर हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर भलताच व्हायरल होऊ लागला आहे. काहींनी रेणुका चौधरी यांच्या भूमिकेचं समर्थन करत अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मात्र, अशा प्रकारे लोकप्रतिनिधींनी खुलेआम धमकी देणं गैर असल्याचा आक्षेप घेतला आहे.

हा आहे तो व्हिडिओ:

भगवाधारी भाजपा के कार्यकर्ताओ को कमजोर मत समझो ???Central Minister And Surguja MP Renuka Singh Didi Nailed It Like a Boss ??जय श्री राम ??

Aabhas Raj Msdian ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 23, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -