घरदेश-विदेशदिल्ली विमानतळावर इंडिगो विमानाच्या इंजिनला आग लागलीच कशी? सरकारचे DGCA ला चौकशीचे...

दिल्ली विमानतळावर इंडिगो विमानाच्या इंजिनला आग लागलीच कशी? सरकारचे DGCA ला चौकशीचे आदेश

Subscribe

दिल्लीहून बेंगळुरुला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे (Indigo Flight Emergency Landing) इमर्जन्सी लँडिग करावे लागले आहे. उड्डाण सुरु असताना विमानातून अचानक आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. ही बाब पायलटच्या लक्षात येता विमान तातडीने थांबवण्यात आले आहे. या विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. आता या घटनेची सरकारने डीजीसीएला कारवाईचे आदेश दिले आहेत. (ministry of civil aviation directs dgca officials to initiate investigation into indigo flight fire incident)

दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानात टेक ऑफदरम्यान आग कशी लागली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. इंडिगोने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. विमानात 180 जण होते. हे सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांच्या यशस्वीरित्या दुर्घटनाग्रस्त विमानातून बाहेर काढण्यात आहे. हे विमान पुन्हा कधी उड्डाण करु शकेल याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे.

- Advertisement -

इंडिगो फ्लाइट क्रमांक A320 मध्ये आगीची घटना घडली. त्या व्हिडीमध्ये बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या A320 विमान टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टीवर धावत असताना अचानक एक ठिणगी उठाली. यावेळी टेक ऑफदरम्यान आगीच्या ज्वाळांना सुरुवात होते. यानंतर पायलटने तात्काळ इमर्जन्सी लँडिंग केले. यानंतर विमानातील 180 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यात 177 प्रवासी आणि सात क्रू मेंबर्स होते.

गेल्या काही महिन्यांपासून देशात अनेक वेळा विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. यात अनेक घटना स्पाइसजेटमध्ये घडल्या आहेत. पण आता इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांमध्येही तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. सध्या विमान कंपनीकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. इंडिगोने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे.


चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; सामूहिक चाचणीचे आदेश, घरातून बाहेर न पडण्याचा फतवा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -