घरताज्या घडामोडीE-Auction: मोदींच्या भेटवस्तूंचा आज ई लिलाव; ऑलिम्पिक खेळाडूंच्या जॅव्हेलिन, बॅडमिंटन, हॉकी स्टिकचा...

E-Auction: मोदींच्या भेटवस्तूंचा आज ई लिलाव; ऑलिम्पिक खेळाडूंच्या जॅव्हेलिन, बॅडमिंटन, हॉकी स्टिकचा समावेश

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे (Narendra Modi 71st birthday). गुजरातमध्ये १७ सप्टेंबर १९५० रोजी मोदी यांचा जन्म झाला. मोदी यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची होती. परंतु अशा खडतर परिस्थितीवर त्यांनी मात केली आणि आज ते पंतप्रधान आहेत. मोदी यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. देशासह संपूर्ण जगभरातून त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. त्या भेटवस्तूचे मोदी काय करतात? असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल. दरम्यान या सर्व भेटवस्तूंचा लिलाव केला जातो. आज मोदींना यांना मिळेल्या भेटवस्तूसह खेळाडूंच्या बॅडमिंटन, हॉकी स्टिक आणि भालाफेक याचा लिलाव होणार आहे. यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ई-लिलाव आयोजित केले आहे. या ई-लिलावातून मिळणारे पैसे नमामी गंगे मिशनला दिले जाणार आहे.

स्मृतिचिन्हांमध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची उपकरणे, अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती, चारधाम, रुद्राक्ष कन्वेंशन सेंटर, मॉडल, मूर्त्या, चित्र, अंगवस्त्र याचा समावेश आहे. एखादा व्यक्ती किंवा संघटना आजपासून ते ७ ऑक्टोबरदरम्यान https://pmmementos.gov.in/#/ या क्लिंक करून ई-लिलावमध्ये भाग घेऊ शकता. ज्या वस्तू आतापर्यंत पंतप्रधान कार्यालाचा शान वाढवत होत्या, त्या २ हजार ७०० वस्तू तुम्ही स्वतःच्या करू शकता.

- Advertisement -

काय-काय असेल लिलावामध्ये?

  • ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेडाळूंचे बॅडमिंटन, हॉकी स्टिक, जॅव्हलिनचा समावेश असेल.
  • राममंदिर प्रतिकृती, चारधाम प्रतिकृती, रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरसह अनेक मॉडेल आणि मुर्त्यांचा लिलाव होईल.
  • त्यानंतर मोदी यांचे अंगवस्त्र, शॉल आणि चित्र इत्यादी वस्तू लिलावात आहेत.

मोदींच्या भेटवस्तूचा लिलाव हा पहिल्यांदाच होत नाही आहे. दरम्यान यावेळेस रेकॉर्डब्रेक बोली लावण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये २ हजार ७७२ भेटवस्तूचा लिलाव झाला होता. यादरम्यान लिलावातून १५ कोटी १३ लाख रुपये मिळाले होते. २०१९मध्ये भेटवस्तूचा लिलाव करून मिळालेली रक्कम नमामी गंगे मिशनसाठी दिली होती.


हेही वाचा – Man Ki Baat : पंतप्रधान व्यक्त करणार जनतेच ‘मन’, देशवासियांकडून मागविल्या सूचना

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -