घरताज्या घडामोडीधक्कादायक घटना! पब्जी-फ्री फायरची उधारी चुकवण्यासाठी आपल्या लहान भावाचीच केली निर्घृण हत्या

धक्कादायक घटना! पब्जी-फ्री फायरची उधारी चुकवण्यासाठी आपल्या लहान भावाचीच केली निर्घृण हत्या

Subscribe

पब्जी-फ्री फायर यांसारख्या गेममुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्याच लहान भावाची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर त्याचे शव त्याने जमिनीत गाडले. पब्जी-फ्री फायरची उधारी चुकवण्यासाठी अल्पवयीन मुलाने आपल्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी दाखल त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ८ डिसेंबर रोजी घडली आहे. धुडीला गावामध्ये राहणाऱ्या प्रवीण शर्मा(१२)ने आपल्या आईचा मुलगा घेत अचानक गायब झाला. प्रवीण घरी न परतल्यामुळे त्याच्या काकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रविणला पब्जी आणि फ्री फायर यांसारखे गेम खेळण्याची सवय होती. आसाममध्ये राहणाऱ्या प्रवीणच्या काकांना एक इन्स्टाग्राम आयडीवर मेसेज आला की, प्रवीण त्याच्या काकांच्या घरी आलाय. जर तो तुम्हाला जीवंत हवा असेल तर ५ लाख रूपयांची व्यवस्था करा.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या सर्व घटनेची आणि इन्स्टाग्राम आयडीवर आलेल्या मॅसेजची चौकशी केली. प्रविणचा आयपी अॅड्रेस सापडत नव्हता. परंतु लोकेशन त्याच्या गावच्या घरातलं दाखवत होतं. त्यानंतर पोलिसांनी प्रविणच्या चुलत भावाची चौकशी केल्यानंतर त्यांना संशय आला. परंतु त्याची चौकशी केली असता मोठा खुलासा समोर आला आहे.

आरोपीने सांगितलं की, पब्जी, फ्री फायर आणि तीन पत्ते यांसारखे गेम तो मोबाईलवर खेळतो. हे सर्व खेळ खेळत असताना त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्याला वेसन करण्याची सवय सुद्धा होती. त्याला पैशांची खूप गरज होती. मात्र, प्रविण सुद्धा त्याच्यासोबत गेम खेळत असे. त्यामुळे गावच्या एका तालावाकाठी घेऊन जाऊन त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचे शव एका जमीनीखाली गाडण्यात आले. तसेच त्याने मोबाईलचा सिमकार्ड काढून फेकून दिला. इन्स्टाग्राम आयडीवर एक फेक आयडी बनवत त्याने दुसऱ्या मोबाईलवर नेटवर्कच्या माध्यमातून हॉटस्पॉट कनेस्ट केलं आणि आसाममध्ये राहणाऱ्या काकांना त्याने फेक तसेच धमकीचा मॅसेड पाठवला होता. दरम्यान, हत्येची आणि संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पुढील चौकशी देखील सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने करावी, चंद्रकांत पाटलांचं खुलं आव्हान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -