घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमध्ये चमत्कार! डॉक्टरांनी WhatsApp द्वारे केली महिलेची प्रसूती

जम्मू काश्मीरमध्ये चमत्कार! डॉक्टरांनी WhatsApp द्वारे केली महिलेची प्रसूती

Subscribe

Miracle in Jammu Kashmir | बर्फवृष्टी होत असल्याने तिला एअरलिफ्ट करणे कठीण होते. तर, वैद्यकीय अधिकारीही प्रसुती केंद्रात पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे केरन PHC मधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना डॉक्टरांनी फोनद्वारे सूचना केल्या.

Miracle in Jammu Kashmir |  श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. बर्फवृष्टी (Snowfall) झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) डॉक्टर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या (WhatsAPp) मदतीने एका गर्भवती महिलेची प्रसुती करण्यात आली आहे. महिलेचा वैद्यकीय इतिहास गुंतागुंतीचा होता. त्यामुळे तिच्यावर तत्काळ उपचार होणे गरजेचे होते. मात्र तुफान बर्फवृष्टीमुळे महिलेला एअरलिफ्टही (Airlift) करता येत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे (Whats App Call) तिची प्रसुती केली. तिने सदृढ बाळाला जन्म दिला आहे.

हेही वाचा – 14 दिवसांनी भारतात परतणाऱ्या विजयचा तुर्कीतील भूकंपात मृत्यू

- Advertisement -

क्रालपोरा ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. मीर मोहम्मद शफी म्हणाले, “शुक्रवारी रात्री केरन पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे एक गर्भवती महिला आली. तिला एक्लॅम्पसिय आणि एपिसिओटॉमीसारख्या वैद्यकीय अडचणी होत्या. त्यामुळे या महिलेला चांगल्या प्रसुती केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, बर्फवृष्टी होत असल्याने तिला एअरलिफ्ट करणे कठीण होते. तर, वैद्यकीय अधिकारीही प्रसुती केंद्रात पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे केरन PHC मधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना डॉक्टरांनी फोनद्वारे सूचना केल्या.

हेही वाचा – तुर्की-सीरियातील भूकंपात 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; लाखो मदतीच्या प्रतीक्षेत

- Advertisement -

क्रालपोरा उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. परवेझ यांनी केरन PHC मधील डॉ. अर्शद सोफी आणि त्यांच्या पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे प्रसूतीची प्रक्रिया समजावून सांगितली. डॉक्टर शफी यांनी सांगितले की, महिलेला नैसर्गिक प्रसुतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे प्रसुती कळा जाणवल्याने तिची नैसर्गिक प्रसुती करण्यात आली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या बाळ आणि आई दोघेही डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून प्रकृती चांगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -