अंगारा देऊन मिरची बाबाने केला बलात्कार, महिलेच्या आरोपानंतर भोंदूला अटक

महिला गुन्हे शाखेत तक्रार दाखल केल्यानंतर या बाबाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भितीपोटी आणि लज्जेखातर तिने पुन्हा तक्रार दाखल केली नाही.

भोपाळ – येथील बहुचर्चित मिरची बाबा (Mirchi Baba) उर्फ महंत वैराग्यानंद गिरीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. मूल होत नसल्याने एक महिला या बाबाकडे गेली होती. त्यावेळी या बाबाने तिच्यावर बलात्कार (Rape by Mirchi baba) केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. तिने यासंदर्भात भोपाळमधील महिला गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. (Mirchi baba arrested in bhopal in the case of rape)

हेही वाचा – चीनमध्ये नव्या झुनोटिक लांग्या व्हायरसची दहशत; आतापर्यंत 35 रुग्णांची नोंद

पीडित महिला मूल न होण्याच्या समस्येमुळे त्रस्त होती. त्यामुळे उपचारांसाठी ती या मिरची बाबाकडे गेली. या बाबाने तिला अंगारा दिला. हा अंगारा खालल्यानंतर महिलेला चक्कर आली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली असा पीडित महिलेचा दावा आहे. बेशुद्ध पडल्यानंतर या बाबाने तिच्यावर बलात्कार केल्याचाही आरोप तिने केलाय. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला याबाबत माहिती पडले असं तिने तक्रारीत म्हटलं आहे. यामुळे तिने थेट महिला गुन्हे शाखेत आपली तक्रार दाखल केली आहे.

महिला गुन्हे शाखेत तक्रार दाखल केल्यानंतर या बाबाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भितीपोटी आणि लज्जेखातर तिने पुन्हा तक्रार दाखल केली नाही. परंतु, महिलेने आता पुढाकार घेऊन या बाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – नियमित दारु पिण्याऱ्यांमध्ये भारतात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वाढली

महिलेने तक्रार केल्यानंतर बाबाला ग्वालियरमधून अटक करण्यात आली आहे. ग्वालियर पोलिसांना याबाबत सूचना मिळताच त्यांनी बाबाला अटक करून त्याची रात्रभर चौकशी करण्यात आली. महिला गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखा यांच्याकडून ग्वालियर पोलिसांकडून या सूचना करण्यात आल्या होत्या. आता या बाबाला महिला गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेकडे पुढील चौकशीसाठी देण्यात आले आहे.