हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीस

हरिद्वारच्या श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज (धार्मिक गुरू मिर्ची बाबा) यांनी ग्रेटर नोएडामध्ये वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्याबाबत मिर्ची बाबांनी मोठं विधान केलं आहे. धर्मगुरू मिरची बाबा नोएडामध्ये मुक्कामावर आहेत.

महामंडलेश्वरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामागे षडयंत्र रचत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे यांचं शिरच्छेद केल्याशिवाय विश्वास बसणार नाही. काली माँ चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवर मिरची बाबा म्हणाले की, अशा कृत्यांमुळे हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. काली माँचं अपमान होत आहे. निरंजनी आखाड्याचे संत म्हणून मी जाहीर करतो की, असे चित्रपट बनवणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना मी २० लाख रूपये देईन, असं मिरची बाबा म्हणाले.

आश्रम या वेब सीरिजचे निर्माते हिंदू धर्मावर आघात करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जो कोणी दिवसाढवळ्या अशा चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करील, त्यांना मी माझ्या आश्रमाच्या वतीने २० लाख रूपयांचे बक्षीस देईन. ही सर्व कामं आंतरराष्ट्रीय षडयंत्रणाखाली केली जातात, असं मिरची बाबा म्हणाले.

पुढे मिरची बाबा म्हणाले की, सर्वत्र कायदेशीर कारवाई केली जात आहे. ठिकठिकाणी अर्ज दिले जात आहेत, मात्र कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही. कायद्याने या लोकांना पकडून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, असं मिरची बाबा म्हणाले.

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काली या चित्रपटाच्या पोस्टरवरून देशात वाद सुरू आहे. यामध्ये काली माँ सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. यासोबतच तिच्या एका हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वजही दिसत आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्या लीना मनिमेकलाई आहेत. खरंतर हा एक डॉक्युमेंट्री चित्रपट असून या चित्रपटाचे नाव ‘काली’ असं आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा या पोस्टवर कारवाई करावी, अशी मागणी करत आहेत.


हेही वाचा : कालीमातेच्या तोंडात सिगारेट तर हातात LGBT चा झेंडा; पोस्टर पाहून युजर्स संतापले