घरदेश-विदेशमनीष सिसोदिया यांच्याशी गैरवर्तन! आप आक्रमक तर, पोलीस भूमिकेवर ठाम

मनीष सिसोदिया यांच्याशी गैरवर्तन! आप आक्रमक तर, पोलीस भूमिकेवर ठाम

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी (Atishi) यांनी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना न्यायालयात नेत असल्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हे ट्वीट रीट्वीट करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्ली पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. यासोबतच त्यांनी केंद्र सरकारवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी देखील ट्विटरवरून या आरोपाला उत्तर दिले आहे.

आप (AAP) नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयात नेत असताना, पत्रकारांनी केंद्राच्या अध्यादेशाबाबत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देण्याच्या तायरीत असतानाच पोलीस पुढे सरसावले आणि त्यांना घेऊन ते पुढे गेल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ ट्वीट करून आतिशी यांनी, मनीष सिसोदिया यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिसाला ताबडतोब निलंबित करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लोकसभेच्या जागांबाबत उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या मतांबद्दल अजित पवार म्हणतात…

तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा व्हिडीओ रीट्वीट करताना दिल्ली पोलिसांबरोबरच केंद्र सरकारबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. मनीष सिसोजिया यांच्याशी असे गैरवर्तन करण्याचा अधिकार आहे का? वरून (केंद्र सरकारने) पोलिसांना हे करायला सांगितले आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांचे ट्विटरवरून प्रत्यु्त्तर
राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना मनीष सिसोदिया यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आपने केला असतानाच, दिल्ली पोलिसांनी मात्र यावर खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध केलेला पोलिसांचा प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तिथे केलेली हालचाल आवश्यक होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी प्रसार माध्यमांसमोर निवेदन देणे कायद्याच्या विरोधात आहे, असे दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत स्पष्ट केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांच्या कोठडीत 1 जून 2023पर्यंत वाढ करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -