घरदेश-विदेशMiss India 2023: मिस इंडिया झालेली नंदिनी गुप्ता कोण?

Miss India 2023: मिस इंडिया झालेली नंदिनी गुप्ता कोण?

Subscribe

फेमिना मिस इंडिया २०२३ च्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये राजस्थान मधील नंदिनी गुप्ताने हा पुरस्कार जिंकला आहे. तर दिल्लीतील श्रेया पूंजा पहिली रनर-अप आणि मणिपूर मधील थौनाऔजम स्ट्रेगला लुवांग ही दुसरी रनर-अप राहली. याचे ग्रँन्ड फिनाले हे मणिपुरमध्ये झाले. यावेळी अनन्या पांडे ते कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, नेहा धुपिया यांच्यासारख्या बॉलिवूड स्टार्सने उपस्थिती लावली होती. अशातच नंदिनी गुप्ता नक्की कोण असे सर्वत्र सर्च केले जात आहे. तिच्याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.

नंदिनी गुप्ता ही केवळ १९ वर्षाची असून राजस्थान मधील कोटा येथे राहणारी आहे. नंदिनी आता मुंबईतील एका कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंट संदर्भात शिक्षण घेत आहे. ती त्याच्या दुसऱ्या वर्षाला आहे. नंदिनीने या इवेंटमध्ये असे म्हटले होते की, आपली ओळख बनवण्यासाठी काही वेळेस अपयशाचा सुद्धा सामना करावा लागतो. जेव्हा करियर किंवा आयुष्याबद्दल विचार करतो तेव्हा काही समस्यांचा सामना आणि मनाविरुद्ध स्थितींचा सामना करावा लागतो. आपले लक्ष्य मिळवण्यासाठई काही आव्हाने सुद्धा स्विकारावी लागतात. अपयश मिलते पण त्यामधून जी शिकवण मिळते त्यामधून शिकत पुढे जायचे असते.

- Advertisement -

बालपणणीच मॉडेल व्हायचे स्वप्न पाहिले
नंदिनीचे वडिल सुमित गुप्ता यांनी असे म्हटले की, नंदिनीला बालपणापासूनच मॉडलिंग करण्याची इच्छा होती. जेव्हा कधी ती टीव्हीवर एखाद्या मॉडेलला पहायची तेव्हा ती त्यांच्या प्रमाणे वागायची. घरातच कॅटवॉक करणे, मेकअप करणे हे तर तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरु केले होते. त्यानंतर जेव्हा ती ९ वी मध्ये गेली तेव्हा तिने तिला मॉडलिंग करायचे आहे असे सांगितले. मॉडलिंग संदर्भात तिने कोणतीच ट्रेनिंग घेतलेली नाही. घरातच ती प्रॅक्टिस करायची.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

- Advertisement -

वडिल शेती करतात
नंदिनीचे वडील सुमित गुप्ता हे एक शेतकरी आहेत. ते कोटा येथेच सांगोद जवळ शेती करतात. यांचा संपूर्ण परिवार जुन्या मंडी परिसरात राहतात. नंदीनीची आई एक गृहिणी असून लहान बीण आता ९ वी मध्ये आहे. वडिलांनी आपल्या मुलीला मिस इंडियाचा पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे.

तर ७१ व्या मिस युनिवर्सचा पुरस्कार USA ची आर बॉनी गॅब्रिएल हिने आपल्या नावावर केला आङे. भारतातील हरनाज संधूने तिच्या डोक्यावर हा मानाचा मुकूट ठेवला. फर्स्ट रनर अप वेनेजुएलची अमेंडा दूदामेल आणि सेकंड रनर अप डोमिनिकल रिपब्लिकची एंड्रिना मार्टिनेज होती. हा सोहळा पेमेंड अमेरिकेच्या न्यू ऑर्लेअंस शहरात पार पडला. यामध्ये २५ वर्षीय दीविता रायने भारताला रिप्रेजेंट केले, जी टॉप ५ मध्ये पोहचू शकली.

 


हे देखील वाचा: मैत्रिणींनो स्वावलंबी व्हा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -