अमेरिकेची आर बोनी ग्रॅबिएल ठरली ‘मिस युनिव्हर्स 2022’ ची विजेती

miss universe 2022 winner rbonney gabriel usa india top 3 contestants

अमेरिकेच्या आर बोनी ग्रॅबिएल हिने यंदाचा मिस युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकला आहे. 15 जानेवारी रोजी न्यू ऑर्लिन्स येथे यंदाच्या 71 व्या मिस युनिव्हर्स 2022 विजेतीची घोषणा झाली. यात अमेरिकेच्या बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला आहे. यावेळी भारताकडून दिविता रायने हिने देशाचे प्रतिनिधित्व केले पण ती टॉप 5 च्या यादीतून आऊट झाली. डोमिनिकन रिपब्लिकच्या अॅड्रियाना मार्टिंज, व्हेनेझुएलाच्या अमांडा डूडामेल आणि यूएसच्या आर बोनी ग्रॅबिएल यांनी टॉप 3 स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळवले. मात्र या सर्वांना मागे टाकून गॅब्रिएलने ही स्पर्धा जिंकली आहे.

यंदा ‘मिस युनिव्हर्स-2022’ या स्पर्धेत 80 हून अधिक ब्युटी क्वीन सहभागी झाल्या होत्या. भारताची दिविता राय टॉप 16 मध्ये पोहोचली पण तिला टॉप-5 मध्ये स्थान मिळवता आले नाही. विजेती आर बोनी गॅब्रिएलने हिला या खास प्रसंगी माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू हिने मुकुट देऊन तिचे अभिनंदन केले.