Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Miss World : २७ वर्षांनंतर भारतात ठरणार विश्वसुंदरी; मिळाले यजमानपद

Miss World : २७ वर्षांनंतर भारतात ठरणार विश्वसुंदरी; मिळाले यजमानपद

Subscribe

 

नवी दिल्लीः Miss World विश्वसुंदरी स्पर्धेचे यजमानपद पुन्हा एकदा भारताला मिळाले आहे. २७ वर्षांनंतर भारतात विश्वसुंदरी ठरणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. याआधी १९९६ मध्ये भारतात ही स्पर्धा झाली होती.

- Advertisement -

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारतासह १३० देशांच्या सुंदरी सहभागी होणार आहेत. भारतात होणारी ही ७१ वी स्पर्धा आहे. मिस इंडिया वर्ल्ड सिनी शेट्टी ही या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारे आहे. या स्पर्धेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. स्पर्धेचे ठिकाणही ठरलेले नाही, असे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी सांगितले.

१९५१ पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. १९६६ मध्ये रिता फारिया या पहिल्या भारतीय सुंदरीने Miss World चा किताब पटकवला होता. त्यानंतर ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्लर यांनीही Miss World किताबावर आपले नाव आहे. ऐश्वर्या राय, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा यांनी अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडली. युक्ती मुखीला अभिनय क्षेत्रात अपेक्षित यश मिळाले नाही. मानुषी छिल्लरचा अभिनेता अक्षय कुमार सोबत आलेला पृथ्वीराज हा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.

रिता फारिया पहिली भारतीय Miss World

- Advertisement -

रीता फारिया पॉवेल ब्रिटिश बॉम्बे मध्ये जन्म झाला. ही एक भारतीय मॉडेल आहे. त्याचबरोबर डॉक्टर आणि सौंदर्यधारक आहे. ज्यांनी १९६६ मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले. भारतात नव्हे तर पूर्ण आशियाई खंडातील सुंदरी होती जिने हा बहुमान पटकवला आहे.

ऐश्वर्या रॉयने कोरले होते Miss World वर नाव

ऐश्वर्या राय बच्चन ही एक भारतीय अभिनेत्री आणि पूर्वीची फॅशन मॉडेल आहे. तिला १९९४ मध्ये फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड पुरस्कार मिळाले. तिने हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश अश्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्याशी ऐश्वर्याचा विवाह झाला. या दाम्पत्याला मुलगी आहे. ऐश्वर्या राय अजूनही चित्रपटांमधून अभियन करते.

प्रियांका चोप्राच्या किताबवर झाला होता आरोप

‘मिस बार्बाडोस २०००’ विजेती लैलानी हिने प्रियांका चोप्राला मिळालेल्या मिस वर्ल्ड किताबवर आरोप केले आहेत. तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड करून प्रियंकावर आरोप केले आहेत. मिस वर्ल्ड २००० साठी प्रियंकाला आयोजकांनी फेव्हर दिल्यानेच ती विजयी ठरली असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. मिस युएसए २०२२ च्या वादाचा संदर्भ देत लैलानी हिनेही २००० साली तिच्यावर अन्याय झाल्याच म्हटलं आहे.. लैलानी म्हणाली की, मिस वर्ल्डमध्येही माझ्याबाबतीत असंच घडलं होतं. मी मिस बार्बाडोस होते. मी जेव्हा त्या स्पर्धेत गेले तेव्हा मला भारताकडून निवडण्यात आलं होतं. १९९९ सालीही भारताकडूनच मिस वर्ल्ड निवडण्यात आली होती. तेव्हा या शोचे स्पॉन्सर भारतीय कंपनी झी टीव्ही होती. २००० च्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी प्रियंकाचा गाऊन चांगल्याप्रकरे डिझाइन करण्यात आला होता. तिला आपल्या घरातच जेवण मिळायचं. तिचे फोटो पेपरात छापून यायचे. दुसरीकडे आमचे ग्रुप फोटो काढले जायचे, असा आरोप तिने केला आहे.

 

- Advertisment -