Nepal Tara Air plane : तब्बल सहा तासांनंतर लागला तारा एअरच्या विमानाचा शोध, ४ भारतीयांसह २२ प्रवासी सुरक्षित

नेपाळमधून (Nepal Tara Air plane) बेपत्ता झालेल्या विमानाचा तब्बल सहा तासांनंतर लष्कराने शोध घेतला आहे. नेपाळच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान हिमालयातील मानापाथीच्या खालच्या भागात दिसले. तसेच हे विमान मुस्तांगच्या कोवांग गावात सापडले. १९ आसन असलेल्या या विमानात ४ भारतीय, ३ विदेशी आणि १३ नेपाळी प्रवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरुन धूर निघताना दिसला, त्यामुळे विमानाचा शोध घेण्यास मोठी मदत झाली. लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या विमानाला भूस्खलनामुळे लामचे नदी परिसरात अपघात झाला. तारा एअरचे विमान लामचे नदीच्या किनाऱ्यावर हिमालयातील मानापथीच्या खालच्या बाजूस कोसळले होते. नेपाळ लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचत आहेत. खराब हवामानामुळे लष्काराला बचाव करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तारा एअरच्या दुहेरी इंजिनच्या विमानाने आज सकाळी पोखराहून जोमसोमला उड्डाण केले होते. विमानाशी शेवटचा संपर्क सकाळी ९.५५ मिनिटांनी झाला होता. विमान फक्त १५ मिनिटांच्या उड्डाणावर होते त्यावेळी २२ प्रवासी प्रवास करत होते. तारा एअर कंपनी मुख्यत्वे कॅनडामध्ये बनवलेले ट्विन ऑटर विमान उडवते.

या विमानाला शेवटचं मुस्तांग जिल्ह्यात पाहण्यात आलं…

या विमानाला शेवटचं मुस्तांग जिल्ह्यात पाहण्यात आलं. या विमानाने माउंट धौलागिरी येथे वळण घेतले. त्यानंतर या विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती मुख्य जिल्हाधिकारी नेत्र प्रसाद शर्मा यांनी दिली होती. संपर्क तुटल्यानंतर विमान कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने शोध मोहिम सुरु करण्यात आली. गृह मंत्रालयाने विमानाच्या शोधासाठी दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले होते.

तपासासाठी खासगी हेलिकॉप्टर रवाना

नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर तारा एयरच्या विमानाचा शोध घेण्यासाठी लेटे, मुस्तांग येथून रवाना झाले आहे. या फ्लाईटमध्ये कॅप्टन प्रभाकर घिमिरे, फ्लाइट अटेंडंट किस्मी थापा आणि अन्य क्रू मेंबर उत्सव पोखरेल हे तीन क्रू सदस्य होते.

कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर अशी विमानातील चार भारतीयांची नावे आहेत. याशिवाय इंद्र बहादूर गोळे, पुरुषोत्तम गोळे, राजनकुमार गोळे, बसंत लामा, गणेश नारायण श्रेष्ठ, रवीना श्रेष्ठ, रश्मी श्रेष्ठ, रोजिना श्रेष्ठ, प्रकाश सुनुवर, मकर बहादूर तमांग, राममाया तमांग, सुकुमाया तमांग, तुलसी देवी तमांग, अश्मी देवी तमांग, डॉ. माईक ग्रीट, उवे विल्नर यांचाही समावेश आहे.


हेही वाचा : Nepal Plane Missing : नेपाळमधून तारा एअरचे विमान बेपत्ता, विमानात 4 भारतीयांसह 22 प्रवासी