घरदेश-विदेशISRO कडून PSLV-C५१ च्या माध्यमातून १९ उपग्रहांचं प्रक्षेपण; बघा व्हिडिओ

ISRO कडून PSLV-C५१ च्या माध्यमातून १९ उपग्रहांचं प्रक्षेपण; बघा व्हिडिओ

Subscribe

PSLV-C ५१ हे PSLV चे ५३ वे मिशन आहे. या माध्यमातून ब्राझीलचा अ‍ॅमेझोनिया - १ उपग्रहही अंतराळात पाठवला जाणार

इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यावर्षीची यंदाची पहिली अंतराळ मोहीम लॉन्च केली आहे. PSLV द्वारे सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी १९ उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण झाले. PSLV-C ५१ हे PSLV चे ५३ वे मिशन आहे. या माध्यमातून ब्राझीलचा अ‍ॅमेझोनिया – १ उपग्रहही अंतराळात पाठवला जाणार आहे. अ‍ॅमेझोनिया -१  प्रायमरी सॅटलाईट आहे. तसेच अन्य १८ उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले आहे. त्यापैकी किडझ इंडियाने एक उपग्रह तयार केला आहे.

- Advertisement -

पीएसएलव्ही-सी ५१ रॉकेट हे पीएसएलव्हीचे ५३ वे मिशन आहे, यात ब्राझीलचा अॅमेझोनिया -१ हा पहिला उपग्रह आहे आणि इतर १८ पेलोड आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या पहिल्या लॉन्चपॅडवरून हे प्रक्षेपित करण्यात आले. तर इस्रोच्या मिशन अंतर्गत सुरुवातीला अंतराळात एकूण २० सॅटेलाइट पाठवण्यात येणार होते. मात्र, त्यातील दोन सॅटेलाइट कमी करण्यात आले. सॉफ्टवेअर संबंधातील काही कारणांमुळे ही संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आनंद हा उपग्रह आणि पीएसएलव्ही-सी ५१ हे रॉकेटही प्रक्षेपित करण्यात आले नसल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

 

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, अमेझोनिया १ च्या मदतीने अमेझॉन क्षेत्रातील वनांची कत्तल आणि ब्राझीलमधील कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांकरता युजर्सना रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच, यंदाच्या नव्या वर्षातील भारतातील ही पहिली वहिली अवकाश अभियान PSLV याकरता मोठ्या स्वरूपाचं असणार आहे. कारण याच्या उड्डाणाची वेळमर्यादी १ तास ५५ मिनिटं ७ सेकंदापर्यंत असल्याचेही सांगितेल जात आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -