नवी दिल्ली : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक विचित्र घटना घडल्याचे पाहायला मिळाले. देशभरात गुरुवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशातच जन्माष्टमीनिमित्त भारतात आलेल्या एका परदेशी तरुणाला गोळीबाराचा आवाज आल्याने त्याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. दरम्यान, या तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सुदैवाने गंभीर दुखापत झाली नसल्यामुळे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तरुणाला आज रुग्णालयातून सोडण्यात आले. नॉर्वे येथील फिन वॅटली येथील तरुण जयपूरला भेट देण्यासाठी आला आहे. (Mistaking the sound of firecrackers for firing a foreign tourist jumped from the hotel and)
हेही वाचा – ‘या’ माजी पंतप्रधानांना G20 शिखर परिषदेतील डिनरचे निमंत्रण, यादीत सोनिया गांधी, खर्गेंचा समावेश नाही
अतिरिक्त डीसीपी (पूर्व) सुमन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिन वॅटली हा नॉर्वेजियन तरुण जयपूरला भेट देण्यासाठी आला होता. जवाहर विवेक विहार येथील सर्कल परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता. गुरुवारी रात्री तो आपल्या खोलीत लवकर झोपायला गेला. मात्र रात्री उशिरा त्याने अचानक दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या खोलीच्या खिडकीतून खाली उडी मारली.
किरकोळ जखमी झाल्यामुळे परदेशी तरुणावर हॉटेलमध्येच प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, झोपेत कोणीतरी तरुणावर गोळी झाडत असल्याचा त्याला भास झाला. त्यामुळे त्याने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी खोलीच्या खिडकीतून उडी मारली. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
हेही वाचा – परदेशात पुन्हा एकदा राहुल गांधी म्हणाले, ‘भारतीय लोकशाही धोक्यात’; देशाचं नाव बदलण्यावरही केलं भाष्य
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त डीसीपी सुमन चौधरी जप्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच परदेशी तरुण राहत असलेल्या खोलीचीही झडती घेतली. मात्र त्यांना काहीही संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी या संपूर्ण घटनेबाबत हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी करत संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा जवळच कृष्ण जन्माष्टमीनिमित्त फटाके उडत होते. अशा परिस्थितीत विदेशी तरुणाने फटाक्यांच्या आवाजाला गोळीबाराचा आवाज समजून गैरसमज केला असेल आणि त्यांनी खोलीच्या खिडकीतून उडी मारली असेल, अशी शक्यात वर्तविली.