घरदेश-विदेशईडी, सीबीआयचा दुरुपयोग; विरोधकांची सुप्रीम कोर्टात धाव

ईडी, सीबीआयचा दुरुपयोग; विरोधकांची सुप्रीम कोर्टात धाव

Subscribe

ईडी आणि सीबीआय या यंत्रणांचा केंद्राकडून दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी कोर्टात धाव घेतली आहे. यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली असून या याचिकेवर ५ एप्रिलला सुनावणी होणार असल्याची माहिती कोर्टाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत ईडी आणि सीबीआयकडून विरोधकांची वारंवार होणारी चौकशी यामुळे विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहे. केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात १४ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मिळून आज शुक्रवारी (ता. २४ मार्च) सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या समोर ठेवले.

दरम्यान, या प्रकरणाची याचिका दाखल झाली असून आता या प्रकरणी पुढील महिन्यात ५ एप्रिलला सुनावणी करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यात केंद्राने विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष केले असून त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कोर्टाने याबाबतच अटक आणि जामीन मंजूर करण्याच्या बाबतीतले दिशानिर्देश या यंत्रणांना द्यावे, अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीच्या प्रमुखांना पत्र लिहिले होते. सर्वात पहिल्यांदा दिल्लीतील अबकारी धोरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. ज्यानंतर याप्रकरणी करण्यात आलेली कारवाई ही चुकीची असल्याची सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित त्या पत्रावर सह्या देखील केल्या होत्या. त्याचबरोबर उद्योजक गौतम अदानी यांच्या प्रकरणावरून देखील १६ विऱोडजी पक्षातील नेत्यांनी ईडीच्या संचालकांना पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये देखी; नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

दरम्यान, ज्या विरोधी पक्षातील नेत्यांची आधी चौकशी करण्यात येते, त्यांच्या भाजपमधील प्रवेशानंतर ही कारवाई थांबवण्यात येते किंवा त्यांच्या विरोधात अत्यंत संथगतीने कारवाई करण्यात येते. अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. तर, नारदा स्लिंग ऑपरेशन प्रकरणात टीएमसीचे माजी नेते शुभेंदू अधिकारी आणि मुकुल रॉय हे ईडी आणि सीबीआयच्या निशाण्यावर होते, परंतु राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या प्रकरणी पुढे कोणतीही चौकशी करण्यात आली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरे-फडणवीस यांच्यात नवी युती? राऊत म्हणतात, विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच…,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -