Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Bengal Election 2021: मिथुन चक्रवर्तींचा रस्त्यावरच 'डिस्को डान्स'!

Bengal Election 2021: मिथुन चक्रवर्तींचा रस्त्यावरच ‘डिस्को डान्स’!

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील गुरूवारी मतदान होत असून ३० जागांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात ३० जागांवर ३४५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. दरम्यान, अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय भविष्याचा निर्णयही या निवडणुकीदरम्यान होणार आहे. तर गुरूवारी नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेला अभिनेता मिथुन चक्रवर्ती प्रचारासाठी हावडा येथे दाखल झाले आहेत. भाजपाचे उमेदवार प्रभाकर पंडित यांच्या समर्थनार्थ निवडणूक प्रचार करण्यासाठी मिथुन सांकराईल विधानसभा मतदार संघाच्या प्रचारसभेत सहभागी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन यांनी मोठ्या सुरक्षेत निवडणुकीच्या प्रचार सभेत आपला सहभाग दर्शवला. गुरूवारी दुपारी साधारण १२ वाजून ३३ मिनिटांनी मिथुन सांकराईल स्टेशनच्या जवळील किशोर संघ मैदानातील तात्पुरत्या हॅलिपॅडवर हॅलिकॉप्टरने उतरले. या ठिकाणी भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यांनतर त्यांनी पुढील प्रचारास सुरूवात केली. मिथुन हे हावरा येथे दाखल झाल्यानंतर त्यांना बघण्यासाठी मोठा जनसमुदाय जमा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनी हावरा येथील रघुदेवबाटीमध्ये निवडणूक प्रचार केला. इतकेच नाही तर रॅलीत मिथुन यांनी डिस्को डान्सर या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले आणि आपला सहभाग नोंदविला.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील नंदीग्राम ही जागा महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरली आहे. ज्याठिकाणी टिएमसी प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपासे शुभेंदु अधिकारी आमने-सामने आले आहेत. डाव्या पक्षांकडून मीनाक्षी मुखर्जी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. इतकेच नाही तर दुसऱ्या टप्प्यातील शुभेंदु अधिकारी यांची विश्वासार्हता धोक्यात आहे, कारण त्यांचात बालेकिल्ला असलेल्या जागेत या निवडणुका होत आहेत. ममता बॅनर्जी आणि शुभेंदु यांनी आपला विजय व्हावा म्हणून कोणतीच कसर सोडली नाही. या दोन्ही उमेदवारांनी पूर्ण ताकदीने नागरिकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ही जागा बर्‍याच काळापासून डाव्या पक्षांकडे आहे, पण नंदीग्राम भूमी आंदोलनापासून टीएमसीने आपले वर्चस्व कायम ठेवले असल्याचे सांगितले जात आहे.


Assembly Election 2021: बंगालच्या ‘वाघिणी’ला शरद पवारांच्या एका पत्रामुळे मिळालं बळ
- Advertisement -