घरCORONA UPDATEऍस्ट्राझेनेका, फायझर लसींचा एक-एक डोस घेतल्यास अँटिबॉडीजमध्ये सहापट वाढ, संशोधनातून खुलासा

ऍस्ट्राझेनेका, फायझर लसींचा एक-एक डोस घेतल्यास अँटिबॉडीजमध्ये सहापट वाढ, संशोधनातून खुलासा

Subscribe

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाटचा धोका कमी होत असतानाच तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. एप्रिलमध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरु लागली. मात्र मेदरम्यान कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घसरु लागली. गेल्या अनेक दिवसांपासून देशात ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरु केली जात आहे. भारतात सध्या कोव्हिशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही लस दिली जात आहे. मात्र सर्वाधिक नागरिकांनी कोव्हिशील्ड लसीचा डोस घेतला. आता या कोव्हिशील्ड लसीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

जगभरात कोव्हिशील्ड लस एॅस्ट्राझेनेका नावाने उपलब्ध आहे. मात्र या उपलब्ध लसींवरही अनेक प्रयोग सुरु आहे. सध्या जगभरात दोन वेगवेगळ्या लसींचा प्रयोग करत प्रभावी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यात ऍस्ट्राझेनेका लसीचा समावेश आहे. अशाच एक प्रयोग दक्षिण कोरियाच झाला आहे. दक्षिण कोरियातील एका संशोधनानुसार, ऍस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोसनंतर फायझर लसीचा दुसरा घेतल्यास खूप फायदा होत असल्याचे समोर आले आहे. या मिक्स लसींच्या डोसमुळे व्यक्तीच्या शरीरात सहापट अधिक अँटीबॉडीज तयार होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

या संशोधनात ४९९ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील १०० जणांना पहिला ऍस्ट्राझेनेका आणि नंतर फायझर लसीचा डोस देण्यात आला. तर २०० जणांना दोन्ही डोस फायझर लसींचे देण्यात आली. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस ऍस्ट्राझेनेका लसीचे देण्यात आले होते.

यावेळी संशोधनात सहभागी कर्मचाऱ्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात प्रभावी अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले. यात फायझरचे दोन डोस घेतलेल्या आणि एक डोस ऍस्ट्राझेनेकाचा आणि दुसरा डोस फायझरचा घेतलेल्या व्यक्तींमधील अँटिबॉडीजचं प्रमाण सारखं होतं. मात्र दोन्ही डोस ऍस्ट्राझेनेका लसीचे घेतलेल्यांपेक्षा एक डोस ऍस्ट्राझेनेकाचा आणि दुसरा डोस फायझरचा घेतलेल्यांच्या अँटिबॉडीज सहा पटीनं अधिक होत्या. ऍस्ट्राझेनेका आणि फायझर लसींचा एक एक डोस घेतल्यास अँटिबॉडीजमध्ये सहापट वाढ असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -