Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी कोरोना लसीच्या डोसचे Mixing And Matching धोकादायक ठरू शकते - WHO

कोरोना लसीच्या डोसचे Mixing And Matching धोकादायक ठरू शकते – WHO

Related Story

- Advertisement -

जगभरात सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. यादरम्यान मिक्स अँड मॅच (Mixing And Matching) कोरोना लसीचा डोस देण्याचा प्रयोग काही देशांमध्ये सुरू आहे. तसेच अनेक वैज्ञानिकांनी मिक्स अँड मॅच लसीचे डोस सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. पण आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मिक्स अँड मॅच लसीचे डोस धोकादायक ठरू शकतात, असा इशारा दिला आहे. WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, कोरोना लसीचे मिक्स डोस घेऊ नका, हे धोकादायक ठरू शकते.

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, हा एक धोकादायक ट्रेंड आहे. कारण अजूनपर्यंत याबाबत कोणताही डाटा उपलब्ध झाला नाही आहे. दरम्यान वेळेवर लसीचे डोस घेणे खूप गरजेचे आहे. जर वेगवेगळ्या देशातील लोकांनी आपल्या मर्जीनुसार दुसरा आणि तिसरा डोस केव्हा घेतला पाहिजे, हे ठरवले तर यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.

- Advertisement -

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भारतात काही लोकांनी लसीचे दोन वेगवेगळे डोस घेतल्याचे प्रकरणे समोर आली होती. हे प्रशासनाच्या चूकीमुळे झाले होते. मात्र पहिला डोस वेगळ्या लसीचा आणि दुसरा डोस वेगळ्या लसीचा घेतल्यामुळे काही लोकांची तब्येत बिघडली.

मिक्स अँड मॅचवर काही वैज्ञानिक अजूनही संशोधन करत आहे की, अशा प्रकारे लसीचे मिक्स डोस देणे फायदेशीर आहे की नाही? परंतु अजूनपर्यंत काही ठोस पुरावा आला नाही आहे, जो समाधाकारक असेल. दरम्यान वेगवेगळ्या लसीचे दोन डोस दरम्यान एक निश्चित अंतर आहे. निश्चित केलेल्या वेळेनुसार लसीचे दोन डोस दिले जातात.


- Advertisement -

हेही वाचा – धार्मिक यात्रा, निष्काळजीपणा थांबवला नाही तर तिसरी लाट होईल घातक – IMAचा इशारा


 

- Advertisement -