Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Mizoram Railway Bridge Collapsed : 17 जणांचा मृत्यू; 35 ते 40 लोक...

Mizoram Railway Bridge Collapsed : 17 जणांचा मृत्यू; 35 ते 40 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Subscribe

Mizoram Railway Bridge Collapsed : मिझोरामच्या (Mizoram) ऐझॉलमध्ये बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून (Railway Bridge Collapsed) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली 35 ते 40 लोक अडकल्याची भीती प्रशानाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मिझओरामच्या सायरंग परिसरात ही घडल्याचे सांगण्यात येत आहे. (Mizoram Railway Bridge Collapsed 17 killed 35 to 40 people are feared trapped under the debris)

हेही वाचा – Chandrayaan-3 वेळेआधीच उतरणार चंद्रावर; इस्रोने ट्वीट करत दिली माहिती

- Advertisement -

ऐझॉलपासून 21 किलोमीटर अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या खांबाचे गर्डर पडले आहेत. पुलाला एकूण चार खांब असून त्यातील तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधील गर्डर कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या गर्डरवर सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची 104 मीटर म्हणजेच 341 फूट आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून ट्वीट करत शोक व्यक्त

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराममधील घटनेबाबत ट्वीट करत शोक व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनीही ट्वीट करताना मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहे. तसेच दुर्घटनेनंतर जखमींना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या लोकांचे त्यांनी आभार मानले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मिझारोममधील ऐजॉलपासून 21 किलोमीटर अंतरावर घडली आहे. बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ढिगाऱ्याखाली 35 ते 40 लोक अडकण्याची शक्यता असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आणखी काही लोकांचा शोध सुरू आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची यांनी सांगितले की, रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -