कशाला ती स्टाईल, कटाळा आलाय— झाडी, डोंगर फेम शहाजी बापू वैतागले

ऑडियोमुळे बापू जिथे जिथे जातात तिथे त्यांना सगळेच जण आग्रहाने ऑडियोमधील डायलॉग बोलायला सांगतात. पण आता खुद्द्द बापूही याला कंटाळले आहेत.

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. त्यांच्या गुवाहाटीतील वास्तव्यादरम्यानच्या एक ऑडीओने बापूंना इतके लोकप्रिय केले की लोकं आता त्यांना नावापेक्षा त्यांच्या ग्रामीण लहेज्यातील डायलॉग्जने ओळखू लागले आहेत. असाच काहीसा अनुभव आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानावेळी बापूंना आला. राष्ट्रपतींचे अभिनंदन तुमच्या स्टाईलमध्ये कसे कराल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर कशाला स्टाईल , कटाळा आलाय , लोकही कटाळतील. असे वैतागून पण स्टाईलमध्ये म्हणत बापूंनी पुन्हा एकदा हास्यकल्लोळ केला.

शिंदेगट गुवाहटीला गेल्यावर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदार नॉट रिचेबल झाल्याने त्यांचे कुटुंबीय तर चिंतेत होतेच पण मीडियाही त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान अनेक आमदारांचे फोन ऑडियो व्हायरल झाले. त्यात शहाजी बापू यांचे त्यांच्या एका कार्यकरत्यांबरोबर झालेले संभाषणाचा ऑडियोही व्हायरल झाला. ज्यात बापू गुवाहाटीतील निर्सग सौंदर्यांबद्दल त्याला सांगत होते. यावेळी आपल्या ग्रामीण स्टाईलमध्ये बापू यांनी ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओक्के!’ असं म्हटंल. त्यांच हे वाक्यच सोशल मीडियावर इतकं लोकप्रिय झालं की त्यावर अनेक जोक्स आणि मीम्स आणि गाणीही व्हायरल झाली. राजकीय व्यक्तीमत्व असलेल्या बापूंमधला साधा ग्रामीण मराठी माणूस त्या संवादातून पहील्यांदाच महाराष्ट्रच नाही तर आंतरराष्ट्रीयस्तरावर घराघरात पोहचला. पण सुरुवातीला गंमत म्हणून व्हायरल झालेल्या या ऑडियोमुळे बापू जिथे जिथे जातात तिथे त्यांना सगळेच जण आग्रहाने ऑडियोमधील डायलॉग बोलायला सांगतात. पण आता खुद्द्द बापूही याला कंटाळले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर जेव्हा पत्रकारांनी त्यांना देशाच्या नव्या राष्ट्रपतींचे अभिनंदन तुमच्या स्टाईलमध्ये कसे कराल असे विचारले तेव्हा बापू भलतेच वैतागले कसली स्टाईल नव्या राष्ट्रपतींना मी २२ तारखेला शुभेच्छा देईन. मी माझ्या स्टाइलमध्ये नव्या राष्ट्रपतींना शुभेच्छा देईन आणि आता कशाला ती स्टाइल. बंद करूया. कटाळा आलाय. महाराष्ट्रातील माणसं पण आता कटाळतील. याचं आता दररोज कुठं ऐकायचं म्हणतील असं हसत सांगत बापूंनी पुन्हा एकदा सगळ्यांना मनसोक्त हसवलं.