Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कर्नाटकात राजकीय नाट्य, विधानसभा अध्यक्षांच्या 'अपशकुनी' खुर्चीवर बसण्यास आमदारांचा नकार

कर्नाटकात राजकीय नाट्य, विधानसभा अध्यक्षांच्या ‘अपशकुनी’ खुर्चीवर बसण्यास आमदारांचा नकार

Subscribe

कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा एका नव्या राजकीय नाट्याला सुरूवात झाली आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपद आणि डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर कोण बसणार?, यावरून वादाला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. कारण या विधानसभा अध्यक्षांची खुर्ची अपशकुनी मानली जात असून एकही आमदार या खुर्चीवर बसण्यास पसंती दर्शवत नाहीये. त्यामुळे या खर्चीवर नेमक्या कोणत्या आमदाराला बसवलं जाणार?, यावरही विचार सुरू असून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

कर्नाटकातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली जात आहे, परंतु पद ‘अपशकुनी’ (अशुभ) मानून जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे या पदासाठी वरिष्ठ नेत्यांचे मन वळवण्यात पक्षाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

मंत्री परमेश्वर यांनाही देण्यात आली ऑफर

डॉ. जी. परमेश्वर यांनी थेट विधानसभेचे अध्यक्षपद नाकारले होते आणि त्यामुळेच त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. आता काँग्रेस पक्ष टीबी जयचंद्र, एचके पाटील, बीआर पाटील आणि वायएन गोपालकृष्ण या ज्येष्ठ नेत्यांपैकी एकाला अध्यक्षपद देण्याचा विचार करत आहे. मात्र, कोणताही नेता पद स्वीकारण्यास तयार होत नाहीये.

- Advertisement -

अध्यक्षपद अशुभ का मानले जाते?

कर्नाटकात सभापतीपद अशुभ मानण्यामध्ये एक खास कारण आहे. यामागील कारण म्हणजे, या पदावर असलेले अनेक राजकीय नेते निवडणुकीत पराभूत झाले आणि अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. 2004 पासून जो कोणी या खुर्चीवर बसला त्याला त्याच्या राजकीय कारकिर्दीत मोठे धक्के बसले आहेत, असे जाणकरांचे म्हणणे आहे.

केआर पेट या मतदारसंघातून, कृष्णा यांनी 2004 मध्ये एसएम कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदही भूषवले होते. पण 2008 मध्ये ते निवडणुकीत पराभूत झाले. 2013 मध्ये विधानसभा अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारणारे काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य कगोडू थिम्मप्पा यांनी 2018नंतरच्या सर्व निवडणुका गमावल्या होत्या.


हेही वाचा : Vidhana Soudha : शुद्धीकरणाचे लोण आता कर्नाटकमध्ये, विधानभवनात शिंपडले गोमूत्र


 

- Advertisment -