Live Updates: शेतकरी आंदोलन; शेतकऱ्यांची ८ तारखेला देशव्यापी बंदची हाक

live update

केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तिव्र झाले आहे. शेतकऱ्यांनी ८ तारखेला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. प्रत्येक राज्यात आंदोलन छेडणार असल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.


लोक समाधानी आहेत, वर्षाचा आढावा घेतला तर लोकं समाधानी, पुढच्या निवडणुकांबाबत उद्धवजी, पवारसाहेब, सोनियाजी हे घेतील…आजचे जे निकाल आहेत, त्यावरुन पुढचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी वाढली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


निवडणूक निकालावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया 

पुढचा प्रवास स्मूथ, कोणताही ब्रेक न लागता, प्रदूषणरहित आणि योग्य वेगाने होईल. निवडणूक निकालावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया


नागपूर पदवीधर मतदार संघात विजय होण्याचा कोटा हा ६०,७४७ आहे, मात्र एवढी मते कुठल्याही उमेदवाराला मिळाली नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. पहिल्या पसंती मध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना ५६, १२६ मते, तर भाजपचे संदीप जोशी यांना ४१,६०६ मते मिळाली आहेत. त्यामुळे अभिजित वंजारी विजयाच्या जवळ आहेत. मात्र अजूनही मत मोजणी सुरुच आहे.


सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पराभूत करत विजयाची हॅटट्रिक साधली आहे. सतीश चव्हाण यांना तब्बल १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतांवर समाधान मानावे लागले आहे. सतीश चव्हाण यांनी ५७ हजार ८९५ मतांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढले असे मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले. सविस्तर वाचा


पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. त्यामुळे अरुण लाड हे सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाणार आहेत.


अमरावतीत दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात

अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक, एलीमिनेशनच्या २० व्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना ६,५२८ मते, महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना ५,४४७ मते मिळाली आहेत. शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांना ५,२०५ मते मिळाली आहेत. एकाही उमेदवाराने एलीमिनेशनच्या प्रक्रियेनंतर कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे.