कोविड सेंटरची परिस्थिती १ आठवड्यात सुधारली नाही तर मनसे स्टाईल धरणे आंदोलन करु- संदीप देशपांडे

यासंदर्भातील पत्र मनसेचे अखिल चितळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. डेरेंनाही दिले आहे.

mns Sandeep Deshpande slams uddhav thackeray govt on eknath shinde political crisis

गोरेगाव कोविड सेंटरचे दोन वेळा उद्घाटन केलं, मात्र ते अजून सुरू झालेलं नाही, उद्घाटन करण्याची घाई दिसते. मुंबईत अनेक डाँक्टर बाहेरच्या राज्यातून आणलेत. जो माणूस बीकेसी कोविड सेंटरला डाँक्टर पुरवू शकला नाही. मग त्यालाच का कंञाट दिलं. कुठे आर्थिक हितसंबध आहेत का? असे म्हणत बीकेसी कोविड सेंटरची परिस्थिती १ आठवड्यात सुधारली नाही तर मनसे स्टाईल धरणे आंदोलन करु असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकार आणि पालिकेला दिला आहे. पालिका आणि सरकारच्या कोविड सेंटरमधील गलथान कारभारावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेत टीका केली आहे.

यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, “आठवडाभर हात जोडून विनंती करतोय. जोडलेले हात सोडायला लावू नका. ज्या कामगारांना कामावरून काढले आहे त्यांची माफी मागितली पाहिजे. तुमचे चुकीचे धंदे जर कोण सांगत तर त्याला तुम्ही कामावरून काढणार? मग त्यांनी लोकांचा कुठे मृत्यू होतोय त्याबद्दल बोलायचे नाही. डेरेंना आणि कॉन्ट्रेक्टर्सला सांगतोय पुढच्या सोमवारपर्यंत वेळ देतोय झालेल्या चुका त्यांनी पुन्हा तपासाव्यात नाही तर जम्बो कोव्हिड सेंटरच्या बाहेर धरणे आंदोलन करु आम्हाला राजकारण करायचे नाही. म्हणून आम्ही आठवड्याभराची मुदत देतोय. असा इशारा त्यांनी पालिकेला दिला आहे.”

“सोमवारपासून पुढच्या आम्ही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करु. आठवड्याभरात डॉक्टरांची नेमणूक करावी तसेच या सर्व प्रश्नांवर आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पण तयार आहोत. आम्हाला त्या ठिकाणी हंगामा आणि गोंधळ घालयचा नाही पण ते सुधारणार नसतील तर आम्हाला तेही करावे लागेल. डॉ. डेरांना नम्रतापूर्वक सांगतो, आम्हाला वेड वाकडं करायचे नाही त्यामुळे डॉक्टर असल्याची लाज बाळगा, घेतलेली शप्पथ आठवा आणि पेशंट्सना बरे करण्याचे काम करा त्यांना मृत्यूचा खाईत लोटून नका. असे धमकी वजा आवाहनही पालिकेले केले आहे.

“दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्या पेशंटच्या इथे कॅमेरे लावले आहेत. परंतु आपल्या पेशंटसोबत काय होतंय हे बाहेरच्या लोकांना कळतं नाही त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेरांचा एक्सेस रुग्णाचा नातेवाईकांना द्यावे जेणेकरून आतमध्ये काय सुरु आहे हे त्यांना कळेल अशी महत्त्वाची मागणी आहे. यासंदर्भातील पत्र मनसेचे अखिल चितळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. डेरेंनाही दिले आहे. या पत्राचा सोमवारपर्यंत विचार करावा नाहीतर आम्ही आहोत नाही आणि ते आहेत. असेही देशपांडे म्हणाले.

वारंवार सांगून यांची गेंड्याची कातडी असेल तर यांनी चपले नाही मारायचे तर कशाने मारायचे. लोकांचा जीवाशी, मृत्यूशी खेळत असाल आणि का तर तो कॉन्ट्रेक्टर नवाब मलिकांचा जवळचा म्हणून त्याला तुम्ही अभय देणार आहेत का? नवाब भाईंनी घोटाळा केला असे मी कुठे बोलतोय. पण जर डॉ. डेरे असे म्हणत असतील की हा कॉट्रेक्टर नवाब मलिकांचा आहे म्हणून मी कारवाई करु शकत नाही तर नवाब भाईंनी सांगावे डेरेंना कारवाई करायला. डेरे घाबरत असतील किंवा डेरेंचा गैरसमज झाला असेल तर नवाब मलिकांनी सांगावे त्यांना मुळात तो माणूस कोणाचा आहे याचाशी आमचे काही देणे घेणे नाही. तिथे जे डॉक्टर असायला पाहिजेत त्यांनी ते डॉक्टर पुरवले पाहिजेत एवढीच मागणी असून मृत्यूंचा डेथ रेट आहे तो कमी झाला पाहिजे. असेही मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.