Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश देशद्रोही निर्मात्यांना लाजा... सीमा हैदरच्या चित्रपटाला मनसेचा विरोध

देशद्रोही निर्मात्यांना लाजा… सीमा हैदरच्या चित्रपटाला मनसेचा विरोध

Subscribe

पाकिस्तान बॉर्डर ओलांडून भारतात आलेली सीमा हैदर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मीडियामुळे पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि भारतातील सचिनची लव्हस्टोरी प्रचंड व्हायरल झाली. ज्यामुळे आता सीमा आणि सचिनची लव्हस्टोरी संपूर्ण जगभरात प्रचलित झाली आहे. शिवाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीमाला बॉलिवूडमधील एका चित्रपटामध्ये झळकण्याची संधी देखील मिळाली. सीमा आणि सचिन यांची आर्थिक परिस्थिती समोर आल्यानंतर बॉलिवूड निर्माते अमित जानी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आणि त्यांनी सीमाला बॉलिवूडमध्ये चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली याबाबत अमित जानी यांनी स्वतः खुलासा केला. दरम्यान, अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी सीमाला धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे.

नुकत्याच काही तासांपूर्वी अमेय खोपकर यांनी एक ट्वीट शेअर केले आहे ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, “पाकिस्तानी नागरिकांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कोणतेही स्थान असता कामा नये. आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत. पाकिस्तानी महिला सीमा हैदर सध्या भारतात आहे. ती ISI एजंट असल्याची अफवा पसरली होती. आपल्या इंडस्ट्रीमध्ये क्षणीक प्रसिद्दीसाठी ते सीमाला अभिनेत्री बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाही? हे लवकरात लवकर बंद करा, नाहीतर मनसेकडून कारवाईसाठी तयार राहा.” अशा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

सीमा- सचिनची लव्हस्टोरी

- Advertisement -

पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन यांची मैत्री पबजी खेळताना झाली होती. ऑनलाईन गेम खेळताना दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर सीमा सचिनला भेटण्यासाठी आपल्या 4 मुलांसह नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली. यानंतर सीमाला 4 जुलै रोजी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.


हेही वाचा : Seema Haider : सीमा हैदर दिसणार बॉलिवूडमध्ये; कोणत्या निर्मात्याने दिली हीरोईन बनण्याची संधी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -