Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्धामुळे मोबाईल फोन, गाड्या, स्टील महागणार

Mobile phones and vehicles can become expensive due to the increasing tension between Russia-Ukraine
Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्धामुळे मोबाईल फोन, गाड्या, स्टील महागणार

रशिया आणि युक्रेन युद्ध हळूहळू भयावह होत आहे. रशियाच्या हल्ल्यात पहिल्याच दिवशी युक्रेनचे १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१६ जण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी दिली आहे. तसेच या युद्धात रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनला एकटे सोडले असल्याचे जेलेंस्की म्हणाले. दरम्यान अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियावर निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होता दिसत आहे. शेअर बाजारापासून ते स्टील उत्पादनापर्यंत युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे मोबाईल फोन, वाहने, सोने, हिरे, स्टील, कोबाल्ट आणि प्लॅटिनम महाग होण्याची दाट शक्यता आहे.

आशिया आणि युरोप हे तांब्याचे निर्यात बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा भारतालाही फटका बसणार आहे. आता तांबे महाग होणार आहे. तांब्यापासून चीप बनवली जाते आणि या चिपचा वापर वाहने आणि मोबाइल फोनच्या निर्मितीमध्ये केला जातो. त्यामुळे तांब्याची किंमत वाढल्यामुळे चिपपासून निर्मित केलेली फोन, वाहने आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग होऊ शकतात. एकूणच रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतासह अनेक देशांना अप्रत्यक्षपणे फटका बसणार आहे.

स्टील महाग झाल्यामुळे गाड्यांच्या किंमती वाढणार

वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या मते, रशियाने गेल्या वर्षी ७६ दशलक्ष टन स्टीलचे किंवा जगातील स्टीलच्या सुमारे 4 टक्के उत्पादन केले. Severstal, NLMK, Average, MMK आणि Mekel हे प्रमुख रशियन उत्पादक आहेत. ते त्यांच्या उत्पादनापैकी निम्मे उत्पादन प्रामुख्याने युरोपला निर्यात करतात. देशात लोखंडी वस्तू बनवणारी Metalloinvest आणि स्टील पाईप्स बनवणारी TMK यांच्याही या यादीत समावेश आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine War: युद्धाच्या पहिल्या दिवशी १३७ जणांचा मृत्यू