घरBudget 2024Mobile Phone : मोबाइल होणार स्वस्त, आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट

Mobile Phone : मोबाइल होणार स्वस्त, आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट

Subscribe

नवी दिल्ली – अर्थसंकल्पाचे वेध लागले की काय स्वस्त होणार, काय महागणार याची चर्चा सुरू होते. हा नेहमीचाच शिरस्ता आहे. यावेळी मात्र, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने मोबाइल फोन स्वस्त केले आहेत. मोबाइल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवरील आयात शुल्क कमी सरकारने केलं आहे. यामुळे आयात शुल्कात 5 टक्क्यांची घट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हेही वाचा – Lalit Teckchandani Arrested : कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डर टेकचंदानीला अटक

- Advertisement -

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने (Government of India) सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. अंतरिम अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारने ही घोषणा करत जनतेला दिलासा दिला आहे. स्मार्ट फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केलं आहे. 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प 2024 (Budget 2024) जाहीर होणार आहे, त्याआधीच सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

मोबाइलच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. मोबाइलसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्यात आली आहे. याचा परिणाम मोबाइलच्या किमतीवरही होणार असून, येत्या काळात मोबाइल फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

महसूल विभागाकडून अधिकृत अधिसूचना जारी

अर्थमंत्रालयाकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महसूल विभागाने 30 जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारत सरकारच्या वित्त मंत्रालय अर्थात महसूल विभागाकडून क्रमांक 50/2017 सीमाशुल्क यांच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. यानुसार, मोबाइल तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर 15 टक्क्यांऐवजी 10 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे. आयात शुल्कात घट झाल्यानेच मोबाइल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -