घरदेश-विदेशआधारशी लिंक मोबाईलची पडताळणी करणे झाले सोपे, UIDAI कडून नवीन सुविधा सुरू

आधारशी लिंक मोबाईलची पडताळणी करणे झाले सोपे, UIDAI कडून नवीन सुविधा सुरू

Subscribe

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मंगळवारी त्यांच्या वेबसाइट आणि मोबाईल ऍपवर एक नवीन सुविधा सुरू केली, ज्याच्या मदतीने नागरिक आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केलेला मोबाईल क्रमांक (Mobile Number) आणि ई-मेल आयडी (E-mail ID) सहजपणे पडताळणी करू शकणार आहेत.

आधार मोबाईल क्रमाकांशी लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरपूर आधी सांगण्यात आले आहेत. त्यानुसार नागरिकांनी मोबाईल क्रमाक आधारशी लिंक केला, परंतु काही प्रकरणात असे दिसून आले की, नागरिकांना त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक आधारशी जोडला गेला आहे हे देखील माहित नव्हते. त्यामुळे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या समस्येवर उपाय शोधून काढला आहे. UIDAI ने एका निवेदनात म्हटले की, “नागरिकांना काळजी वाटायची की आधार कार्डचा OTP दुसऱ्या मोबाईल नंबरवर गेला तर त्यांना कळणार नाही. पण आता नवीन सुविधेमुळे नागरिक त्यांच्या आधारशी कोणता मोबाईल किंवा ई-मेल आयडी लिंक आहे हे सहज शोधू शकणार आहेत.

- Advertisement -

UIDAI च्या निवेदनानुसार, अधिकृत वेबसाइट किंवा माय आधार ऍपद्वारे ‘ईमेल/मोबाइल नंबर’ पडताळणी वैशिष्ट्यांतर्गत नवीन सुविधेचा लाभ घेतला जाऊ शकतो. जर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर नवीन सुविधा नागिरकांना सूचित करते आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याबाबत माहिती देते. जर मोबाईल क्रमांक आधीच पडताळणी केला असेल तर नागरिकांना स्क्रीनवर एक संदेश प्रदर्शित केला जाईल. तुम्ही प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर आमच्या रेकॉर्डवरून आधीच पडताळणी झाला आहे, असा संदेश नागरिकांना दिसेल. आधार कार्ड घेताना नागिरकांना दिलेला मोबाईल क्रमांक त्यांना आठवत नसेल, तर अशावेळी तो माय आधार पोर्टल किंवा माय आधार ऍपवर नवीन सुविधेअंतर्गत मोबाईलचे शेवटचे तीन क्रमांक टाकून शोध घेऊ शकतात किंवा UIDAI, ईमेल आणि मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी जवळच्या आधार केंद्राला भेट देता येऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -