घरदेश-विदेशआजपासून ग्राहकांच्या खिशाला झळ, मोबाईल, वाहनांचे दर अन् विमान प्रवासही महागणार

आजपासून ग्राहकांच्या खिशाला झळ, मोबाईल, वाहनांचे दर अन् विमान प्रवासही महागणार

Subscribe

मोबाईल फोन महागणार

देशात आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलण्यात येणार आहेत. याचा परिणाम नोकरदारवर्गापासून ते सर्वसामान्यांच्या खर्चावर होणार आहे. मोबाईल फोन, बाइक कार, टीवी, स्टील,एसी, फ्रिज आणि कूलर अशा गोष्टी महागणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांवर महागाईची टांगती तलवार राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या गोष्टी होणार महागणार आहेत. कोरोना काळामध्ये सर्व उद्योगधंदे बंद पडले होते. त्यामुळे कोरोना काळानंतर आतंरराष्ट्रीय बाजार ते देशांतर्गत बाजारपेठेत पुर्वीच महागाईचा भडका उडाला असताना १ एप्रिलपासून नव्या नियमांनुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार आहेत.

विमान प्रवास

देशात १ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार आहे. सरकारने देशांतर्गत विमान प्रवास करण्याच्या भाड्यात ५ टक्के वाढ केली आहेत. तसेच एयरपोर्ट सिक्योरिटी फी देखील देशांतर्गत प्रवाशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

- Advertisement -

मोबाईल फोन महागणार

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्पात मोबाईल फोन वर इमोर्ट ड्यूटी वाढवण्याची घोषणा केली होती. यामुळे मोबाईल फोन्सच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे. तसेच चार्जर, एडाप्टर आणि मोबाईलची बॅटरीसारखी साधनेही महागणार आहेत.

वाहनांच्या किमंतीत वाढ

बाइक-कार तसेच आणखी काही वाहनांच्या किंमतीमध्ये आजपासून वाढ होणार आहे. वाहन निर्मितीत अग्रेसर असलेल्या मारुति आणि निसान कंपनी तसेच अनेक वाहन निर्मिती कंपन्यांनी वाहनांच्या दरात वाढ करणार असल्याचे सांगितले होते. परंतु किती वाढ करणार याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

- Advertisement -

टीव्ही माहागणार

आजपासून टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दरात २ ते तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे. चीनी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी आणल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू महागल्या आहेत. गेल्या महिन्यांपासूनच टीव्हीच्या दरात वाढ झाली आहे.

स्टील

कोरोना काळानंतर स्टीलच्या दरात वाढ झाली आहे. परंतु आता पुन्हा एकदा तुम्हाला अधिक किंमत द्यावी लागणर आहे. कच्चा मालाच्या किंमती वाढल्या असल्यामुळे उत्पादनात घट झाली असल्यामुळे दरात वाढ झाली आहे.

AC, फ्रिज आणि कूलर

AC, फ्रिज आणि कूलरसाठी १ एप्रिलपासून अधिक किंमत द्यावी लागणार आहे. कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्यानंतर कंपन्यांनी एसी, कूलरच्या दरात अधिक वाढ केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -