घरताज्या घडामोडीसुंदर दिसण्यासाठी मॉडेलने केली ब्रेस्ट सर्जरी आणि आयुष्य झाले उद्ध्वस्त

सुंदर दिसण्यासाठी मॉडेलने केली ब्रेस्ट सर्जरी आणि आयुष्य झाले उद्ध्वस्त

Subscribe

आजकाल सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती चेहऱ्यापासून शरीराच्या इतर अवयवांची देखील सर्जरी करतात. मात्र त्यानंतर सर्जरी उगाच केली की काय असे त्यांना वाटू लागते. असे काहीसे अमेरिकेतल्या मॉडेलसोबत घडले आहे. अमेरिकेत राहणारी ३० वर्षी मॉडेल कर्मन कर्माने खूप सुंदर दिसण्यासाठी ब्रेस्ट सर्जरी केली. या सर्जरीसाठी जवळपास तिने ३८ लाख रुपये खर्च केले. परंतु सर्जरीनंतर मॉडेलची प्रकृती बिघडू लागली. मॉडेल म्हणाली की, ‘या सर्जरीमुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.’

डेली स्टारच्या वृत्तानुसार, अमेरिकन मॉडेल कर्मनने एका मुलाखतीमध्ये ब्रेस्ट सर्जरीमुळे तिला कोणकोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे हे सविस्तर सांगितले. खरे म्हणजे कर्मनने आपल्या ब्रेस्टवर दोन वेळा सर्जरी केली. पहिल्यांदा २०१४मध्ये तिने ब्रेस्टची साईज 34B हून 34F केली. परंतु कर्मनाला इंडस्ट्रीमध्ये आणखीन यश मिळण्यासाठी अजून आकर्षक दिसावे लागेल आणि यामुळे जास्त काम मिळलेले असे वाटले. त्यामुळे कर्मनने २०१८मध्ये पुन्हा सर्जरी केली.

- Advertisement -

कर्मन सांगितले की, सिलिकॉन इम्प्लांट (Silicone Implant) केल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला. सर्जरीनंतर कर्मनला प्रत्येक दिवशी मायग्रेनची समस्या जाणवू लागली. जास्त करून थकवा येत असल्यामुळे ती अंथरुणावरून उठायची नाही. ती दिवसातून तीन वेळा झोपत होती. तिला आजारी असल्यासारखे वाटू लागले होते. तसेच यामुळे मृत्यू होईल अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली. यामुळे ती मुलावर लक्ष देऊ शकत नव्हती. कारण ती जास्तीत जास्त झोपतच होती. तसेच यामुळे तिचे वजन वाढले. मग श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. एवढेच नाही तर एका सामान्य व्यक्तीसारखे ती काही करू शकत नव्हती.

तिला एडल्ट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये खूप यश मिळवायचे होते. त्यामुळे तिने सर्जरी केली होती. परंतु ती एका वर्षात फक्त दोन शूट करू शकली. त्यानंतर डॉक्टरच्या फेऱ्या वाढल्या. ब्रेस्ट सर्जरीमुळे आजारी असल्याचे तिला समजले. त्यानंतर कर्मनने Silicone Implant हटवण्यासाठी पुन्हा सर्जरी केली. मग पुन्हा तिचे आयुष्य रुळावर आले. आता तिला पूर्वीपेक्षा खूप बरे वाटते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -