घरCORONA UPDATEअमेरिकन कोरोना लसीच्या चाचणीनंतर Moderna कंपनीने दिली Good News!

अमेरिकन कोरोना लसीच्या चाचणीनंतर Moderna कंपनीने दिली Good News!

Subscribe

जगभरासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. दिवसरात्र शास्त्रज्ञ कोरोनावरील औषधं, लस शोधण्यात गुंतले असताना अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने तयार केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीसंदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. कंपनीने म्हटले आहे की सुरुवातीच्या चाचणीत असे आढळले आहे की, या लसीमुळे वृद्ध रुग्णांमध्येही प्रतिकारशक्ती निर्माण होते. या चाचणीत ५६ ते ७० वर्षे वयोगटातील १० आणि ७१ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १० लोकांचा समावेश असल्याचे मॉडर्ना कंपनीने बुधवारी सांगितले. सर्व स्वयंसेवकांना २८ दिवसांच्या फरकाने १०० mg चे दोन डोस देण्यात आले.

या स्वयंसेवकांमध्ये न्यूट्रलायजिंग अँटीबॉडीज सापडल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिकारशक्तीसाठी या अँटीबॉडीज आवश्यक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. कंपनी म्हणाली की स्वयंसेवकांमध्ये आढळलेल्या अँटीबॉडीजचे प्रमाण कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांपेक्षा जास्त होते.

- Advertisement -

मॉडर्ना कंपनीच्या मते, लसीचे डोस घेत असलेल्या लोकांमध्येही कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. काही रूग्णांनी डोकेदुखी आणि थकवा असल्याची तक्रार केली पण हे सौम्य दुष्परिणाम दोन दिवसातच संपले. तर अमेरिकेत बर्‍याच कोरोना लसीवर काम सुरू आहेत. त्यापैकी मॉडर्नाची लस चांगल्या कँडिडेटमध्ये मोजली जात आहे. मॉडर्नानेही फेज -३ चाचणी सुरू केली आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगभरात एकूण १७० लसींवर काम सुरू आहे.


Corona: एक महिन्यापूर्वी आपल्या लोकांना चीनने दिली होती कोरोनाची लस!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -