अमेरिकेने दिली खुशखबर; लॉकडाऊनच चक्र लवकरच संपणार

अमेरिकेची कोरोनावरील लस मानवी चाचणीत यशस्वी ठरली आहे.

corona vaccine
लस

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देशात लस शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त लसीच्या चाचण्यांचे विविध स्तरावर परिक्षणे करण्यात आली आहेत. यामध्ये भारतात बनवण्यात आलेल्या दोन लसींचीही मानवी चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परिक्षणामध्ये यशस्वी ठरली असतानाच आता जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही खुशखबर अमेरिकेने दिली आहे.

मॉर्डन कंपनीनेने विकसित केली लस

कोरोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डन कंपनीने विकसित केलेली लसही फेज १ च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे. मॉर्डन कंपनीने विकसित केलेल्या लसींची ४५ तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये ही लस मानवी शरीरासाठी सुरक्षित असून रोगप्रतिकारक शक्तीला चालना देत असल्याचे दिसून आले असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. याबाबत अमेरिकन संशोधकांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. तसेच ज्या स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले, त्यांच्या शरीरात व्हायरसला मारणाऱ्या अँटीबॉडीजची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाल्याचे दिसून आले.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिच्या माहितीनुसार; कोरोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात जितक्या अँटीबॉडीज आहेत, त्यापेक्षा हे प्रमाण जास्त होते. महत्त्वाचे म्हणजे मॉडर्नाची ही लस दिल्यानंतर गंभीर साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. लस घेणाऱ्या निम्म्या स्वयंसेवकांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपांची लक्षणे दिसली आहेत.

लसचे दुष्परिणाम

ही लस दिल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम दिसून आले नाही. ही लस दिल्यानंतर थकवा, डोकेदुखी, थंडी, स्नायुंचे दुखणे आणि इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे अशा तक्रारी स्वयंसेवकांनी केल्या. विशेष म्हणजे मॉर्डनाच्या लसीचा दुसरा डोस आणि खासकरुन जास्त क्षमतेचा डोस घेतल्यानंतर ही लक्षणे दिसून आली आहेत. रशियाने विकसित केलेली लस घेतल्यानंतरही काही स्वयंसेवकांनी अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. लॉकडाउनमुळे मंदी आणि बेरोजगारीचे चक्र सुरु आहे. या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी कोरोनाचे समूळ उच्चाटन करु शकणाऱ्या लसीची तातडीची आवश्यकता आहे. त्यामुळेच मॉर्डना, सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेल्या लसीचे यश जगासाठी दिलासा देणारी बाब आहे. वर्षअखेरपर्यंत लस बाजारात आणण्याचे अमेरिकेचे उद्दिष्टय आहे. त्या दृष्टीने फक्त मॉर्डनाच नाही तर अन्य कंपन्यांनाही अमेरिकेने लस निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.


हेही वाचा – CoronaVirus चं आणखी एक नवं लक्षण आलं समोर!