घरदेश-विदेशमोदी ठरले सर्वात महागडे पंतप्रधान

मोदी ठरले सर्वात महागडे पंतप्रधान

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विदेश दौऱ्यांचा खर्चाचा आकडा समोर आला आहे. हा आकडा माहित पडल्यावर तुमच्या भूवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंतच्या देशाच्या पंतप्रधानांपैकी महागडे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी त्यांच्या साडे चार वर्षाच्या कार्यकाळात म्हणजेच ५५ महिन्यात ९२ विदेश दौरे केले आहेत. या दौऱ्यांचा खर्च तब्बल २०२१ कोटी रुपये इतका आहे. मोदींनी आतापर्यंत ९२ दोरे केले आहेत. यापुढे आणखी कुठल्या दौऱ्यावर मोदी जाणार आहेत का, असा प्रश्न एका अधिकाऱ्याला विचारले असता, त्याने नाव न सांगण्याचे अटीवर सांगितले आहे की, आता यापुढे कुठल्याही परदेश दौऱ्याचे नियोजन मोदींच्या वेळापत्रकात नाही. त्यामुळे गेल्या ५५ महिन्यातील मोदींच्या विदेश दौऱ्याच्या खर्चाविषयी माहिती समोर आली आहे. मोदींच्या ९२ दौऱ्यात तब्बल २०२१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. याउलट डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात १३५० कोटी रुपये खर्च केला गेला होता. त्यांनी ५० देशांचा दौरा केला होता.

हा दौरा सर्वाधिक खर्चिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सत्तेवर आले. त्यानंतर त्यांनी जून २०१४ मध्ये सर्वात पहिला विदेश दौरा केला होता. तर, यावर्षीचा २८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर असा मोदींचा शेवटचा दौरा होता. त्यानंतर मोदी परदेशात गेलेले नाही. यावर्षी मोदींनी १४ विदेश दौरे केले आहेत. मोदींच्या दौऱ्याचा सरासरी खर्च काढसल्यास प्रत्येक दौऱ्याला त्यांना २२ कोटी रुपये खर्च आला आहे. ९ एप्रिल ते १७ एप्रिल २०१५ दरम्यान मोदी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनेडा दोशांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांना सर्वाधिक असा ३१.२५ कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्याखालोखाल ११ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०१४ हा खर्चीक असल्याचे समोर आले आहे. या दौऱ्यासाठी २२.५८ कोटी रुपयांचा खर्च आला होता.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर २८० मिलियन खर्च

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -