घरताज्या घडामोडीModi Cabinet Expansion : धोत्रे, हर्षवर्धन, निशंक यांचा मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी राजीनामा, कारण...

Modi Cabinet Expansion : धोत्रे, हर्षवर्धन, निशंक यांचा मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी राजीनामा, कारण काय? वाचा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना आणि मंत्रिमंडळमधील मंत्र्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. एकूण ४१ मंत्री बुधवारी संध्याकाळी ६ वाजता शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी दिग्गज मंत्र्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, सदानंद गौडा यांसह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय परंतु या नेत्यांच्या राजीनाम्या मागे काय कारण आहे ते जाणून घ्या.

केद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी आतापर्यंत ९ ते १० नेत्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राचेही काही मंत्री आहेत केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा दिला आहे. परंतु दानवेंच्या राजीनाम्याबद्दल अजूनही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. तसेच संजय धोत्रे यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे.

- Advertisement -

या मंत्र्यांकडून मागितला राजीनामा

डॉ. हर्षवर्धन – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील कोरोना परिस्थिती भयावह झाली होती. या लाटेतील उपाययोजनांमुळे केंद्र सरकारवर बऱ्याच टीका करण्यात आल्या होता. यामुळे या परिणामांना आता डॉ.हर्षवर्धन यांना सामोरे जावे लागणार आहे. हर्षवर्धन यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे कामकाजही होते परंतु राजीनाम्यानंतर दोन्ही मंत्रीपदे रिक्त झाली आहेत.

बाबुल सुप्रियो- पश्चिम बंगालच्या आसनसोलचे खासदार बाबुल सुप्रियो यांनीही राजीनामा दिला आहे. सुप्रिया यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचं राज्यमंत्री पद होते. मिळालेल्या माहितीनुसार बाबुल सुप्रिया भाजपवर नाराज आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सुप्रियो यांनी लढवली परंतू ५० हजार मतांनी पराभूत झाले.

- Advertisement -

देबोश्री चौधरी – भाजप खासदार देबोश्री चौधरी यांचा राजीनामा मागण्यात आला आहे. चौधरी यांच्याकडे महिला व बाल विकास राज्य मंत्री पदाचा कार्यभार होता. मिळालेल्या माहितीनुसार देबोश्री चौधरी यांच्यावर मोठ्या पदाची जबाबदीर देण्यात येणार आहे.

रमेश पोखरियाल निशंक – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचाही राजीनामा मागण्यात आला आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारचे खासदार आहेत. निशंक हे मानव संसाधन विकास मंत्री होते. रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे एक महिना रुग्णालयात होते. निशंक यांनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला.

सदानंद गौडा – कर्नाटक उत्तर बंगळूरुचे भाजप खासदार सदानंद गौडा यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. गौडा यांच्याकडे रसायन व खत या खात्याचे मंत्री होते. कोरना कालावधीत औषधांच्या तुटवड्यामुळे मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला होता याला सदानंद गौडा जबाबदार असल्याचे कळते आहे.

संतोष गंगवार – उत्तर प्रदेशच्या बरैलीचे खासदार संतोष गंगवार यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते कामागार व रोजगार मंत्री होते. कोरोना काळात गंगवार यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केल्याचं पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यांच्या जागी आता लखीमपुर खीरीचे खासदार अजय मिश्रा यांना मंत्री करण्यात येणार आहे.

संजय धोत्रे – महाराष्ट्राचे सुपुत्र आणि अकोलाचे खासदार संजय धोत्रे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. शिक्षण राज्यमंत्री तसेच विज्ञान मंत्रालयाचं कामकाजाची धोत्रे यांच्यवर जबाबदारी होती. धोत्रे यांच्या कारभारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

रतन लाल कटारिया – हरियाणा अंबालाचे खासदार रतन लाल कटारिया यांनी राजीनामा दिला आहे. कटारिया हे जलशक्ति मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. त्यांच्या जागी आता सिरसाचे खासदार सुनीता दुग्गल यांना मंत्री बनवण्यात येणार आहे.

प्रताप सारंगी – ओडिशाच्या बालासोर खासदार प्रताप सारंगी यांचाही राजीनामा मागण्यात आला आहे. त्या सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योगांसह, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री होत्या.

रावसाहेब दानवे – महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. रावसाहेब दानवे जालना भोकरदनचे खासदार आहेत. दानवेंकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीपदाची जबाबदारी आहे. दानवेंनी राजीनामा दिला असल्याचे कळते आहे परंतु अधिकृत माहिती मिळाली नाही.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -