घरदेश-विदेशअभिनंदन करावं एवढं मोठं मन मुख्यमंत्र्यांचं नाही; राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

अभिनंदन करावं एवढं मोठं मन मुख्यमंत्र्यांचं नाही; राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

नारायण राणेंची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर जहरी टीका

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला असून नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात खासदार नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधीत सर्वात प्रथम नारायण राणे यांनी शपथ घेतली. यानंतर आज मंत्रीपदाचा पदभार स्वीकरला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवेसना खासदार संजय राऊत यांचावर जोरदार निशाणा साधला आहे. राणेंनी माध्यमांशी बोलताना ”अभिनंदन करावं एवढं मोठं मन मुख्यमंत्र्यांचं नाही” असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तर ”संजय राऊतला काहीना काही बोलायचंच असतं. ते चांगले नाही. वाईटं तेचं बोलायचे असते. अशी टीका संजय राऊतांवर केली आहे.

”संजयला सांगेन खातं बरं वाईट नसतं, काम कसं करतो हे महत्त्वाचे असते. या खात्याला मी न्याय देईन तेव्हा संजय राऊतचं म्हणतील, खरोखर हे खातं चांगल होतं.. मोठं होत.. महत्त्वाचे होतं..असा अभिप्राय देतील. अशी जहरी टीकाही राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.

- Advertisement -

सर्वप्रथम ओम गणेश लिहून नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी बोलाताना राणे म्हणाले की, “गणरायाचे आशिर्वाद घेऊन माझ्या कामकाजाला सुरुवात केली. केंद्रीय मंत्रीमंडळात मला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे प्रवेश मिळाला आहे. म्हणून मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो त्यांचे ऋण व्यक्त करतो. त्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आशिर्वाद सहकार्य आहे. त्यांचाही मी अतिशय ऋणी आहे. पंतप्रधानांना अभिप्रेत असे काम करण्याचा प्रयत्न करेन. पंतप्रधानांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवण्याचा प्रयत्न करेन. असा विश्वास व्यक्त केला.

तसेच ” खात्याबद्दल पूर्ण माहिती, अभ्यास केल्याशिवाय मी आत्मविश्वास व्यक्त करणार नाही. खातं समजून घेईन, त्यानंतर खातं पळवायचे की चालवायचे ते ठरवेन. हे खाते सेवा म्हणण्यापेक्षा विकासात्मक काम करु शकतं. देशाचे दरडोई उत्पन्न आणि जीडीपी वाढवायला हे खातं अतिशय उपयुक्त आहे. विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं खातं आहे. मला दिलेलं खातं देशाचा विकास करण्यासाठी आहे, रोजंदारी निर्माण करण्यासाठी आहे, आणि त्यादृष्टीने मी काम करेन. असा विश्वासही पुढे राणे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

कायम आठवणीत राहणाऱ्या शुभेच्छांबद्दल सांगताना राणे म्हणाले की, पहिल्या शुभेच्छा मला माझ्या नातवांकडून मिळाल्या. शपथ घेऊन बाहेर आलो तेव्हा माझा नातू अभिराज आणि निमिश या दोघांनी मला फोन करत अभिनंदन केले. या शुभेच्छा माझ्या कायम लक्षात राहतील, तसेच अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्याही शुभेच्छा देणारे फोन आल्याचे राणे सांगतात.

खासदार नारायण राणे यांच्यासह खासदार भारती पवार आणि रावसाहेब दानवे यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आलीत. यात भारती पवारांनी आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर खासदार रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्री म्हणून रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -