Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी हातात छत्री आणि गळ्यात गमछा मोदींच्या लुकवर रंगल्या चर्चा

हातात छत्री आणि गळ्यात गमछा मोदींच्या लुकवर रंगल्या चर्चा

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पेहराव यामागे नेहमीच एखादातरी संदेश दडलेला असतो. असंच काहीसं चित्र आज राजधानी दिल्लीतही पाहायला मिळालं.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी दिल्लीत दमदार पावसाने हजेरी लावली. यावेळी सफेद कुर्ता व पायजमा आणि गळ्यात गमछा घातलेल्या मोदींनी चक्क स्वत: हातात छत्री घेत मीडियाला संबोधित केले. पंतप्रधान पदावर असूनही स्वत; हातात छत्री घेत साध्या पेहरावात अधिवेशनासाठी आलेल्या मोदींचा हा सिंपल लुक सगळ्यांनाच भावला आणि अधिवेशनापेक्षा चर्चा रंगली ती मोदींच्या सिंपल लुकची.

नंतर मोदींचा हातात छत्री घेतलेला सिंपल लुकचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. साधी राहणी उच्च विचार अशा मथळ्याखाली हा मोदींचा हा फोटो व्हायरल होत आहे. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गिय यांनी मोदींचा हा फोटो टि्वट केला. साधी राहणी उच्च विचारांच्या सि्दधांतावर चरितार्थ करणाऱ्या मोदींचा हा फोटो असून पावसाळी अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी पत्रकारांशी चर्चा करतानाचा हा फोटो असल्याचे विजयवर्गीय यांनी टि्वट केले आहे.

- Advertisement -

तर काही यूजर्सनी जगभरात सर्वात मोठं लोकतंत्र असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी स्वत:च्या हातात छत्री पकडत मिडियाशी संवाद साधला. म्हणूनच आम्ही म्हणतोय की मोदींसारखं कोणीच बनू शकत नाही. असं टि्वट करत मोदींप्रती आदर व्यक्त केला आहे.

- Advertisement -

तर काहीजणांनी मोदींनी सामान्याप्रमाणे हातात छत्री पकडल्याचे आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच त्यांच्या याच साध्या राहणीमानामुळे त्याचं स्थान उच्च असल्याचे म्हटले आहे.

मोदींनी १ मार्च २०२१ रोजी पहीला लशीचा डोस घेतला. त्यावेळी सफेद कुर्ता आणि गळ्यात आसामचा गमछा घातला होता. तर मोदींना ज्या नर्सने लस दिली ती केरळची होती. तेव्हा बंगाल, केरळ आणि आसाममधल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवतच मोदींनी पेहराव केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.

 

- Advertisement -