घरदेश-विदेशमोदींनी व्यंकय्या नायडूंची केली विनोबा भावेंशी तुलना, म्हणाले...

मोदींनी व्यंकय्या नायडूंची केली विनोबा भावेंशी तुलना, म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची तुलना आचार्य विनोबा भावे यांच्याशी केली आहे. मोदींनी लिहिलेल्या 3 पानी पत्रात, पीएम मोदींनी व्यंकय्या नायडू यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या दृढ विश्वास आणि उर्जेची प्रशंसा केली. राज्यसभेत पहील्यांदा येणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि राज्यसभेच्या कामकाजात चांगली कामगिरी आणि सुधारणा केल्याबद्दलही त्यांनी व्यंकय्या नायडूंचे कौतुक केले आहे.

पीएम मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी सभागृहात तुमच्या निरोपाच्या भाषणात काही गोष्टी बोलल्या होत्या. त्यावेळी माझ्या मनात तुझ्याशी संबंधित अनेक आठवणी आणि अनुभव होते. नेल्लोरच्या रस्त्यांपासून ते उपराष्ट्रपती पदापर्यंतचा तुमचा जीवन प्रवास अद्भुत आणि प्रेरणादायी आहे. तुमची उर्जा आणि धैर्य आश्चर्यकारक आहे, असे मोदींनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

केला अनुभव शेअर –

माजी उपराष्ट्रपतींशी संबंधित एक अनुभव शेअर करताना पीएम मोदींनी लिहिले की, अडवाणी जी रथयात्रेदरम्यान माझ्यावर अनेक प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. यादरम्यान मी रथयात्रेत तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशातील काही भागात आयोजित कार्यक्रमांचा अनुभव खूप चांगला होता. जेव्हा मला याचे कारण जाणून घ्यायचे होते तेव्हा त्यांनी सांगितले की, व्यंकय्या नायडू यांच्यासारखे नेते होते ज्यांनी तेलुगूमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने भाषण केले आणि त्याचा प्रेक्षकांवर खोलवर परिणाम झाला.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिले की, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या जीवनातून मी नेहमीच प्रेरित राहीन. तुमचा आदरातिथ्य उत्तम आहे. पत्राचा समारोप करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू जी, तुम्ही तुमच्या कार्यकाळात देशासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला भविष्यातही अनेक प्रसंगी भेटण्याची आशा करतो.

व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर देशसेवेचा “अपूर्ण प्रवास” पुन्हा सुरू करतील आणि आगामी काळातही ते लोकांशी संवाद साधत राहतील आणि त्यांचे लक्ष तरुण आणि शेतकरी यांच्यावर असेल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -