घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींनी घेतला बाजरीच्या भाकरीचा आस्वाद

पंतप्रधान मोदींनी घेतला बाजरीच्या भाकरीचा आस्वाद

Subscribe

संसेदत मोदी यांच्या जेवणाचे खास नियोजन करण्यात आले होते. जवळपास ४० मिनिटे मोदी तेथे थांबले होते. यावेळी राजकीय मेतभेद सोडून सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. केंद्रीय शेतीमंत्री नरेंद्र तोमर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा व अन्य नेते उपस्थित होते. 

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारच्या जेवणात बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या जेवणात बाजरीपासून बनवलेले खास पदार्थ होते. संसदेतील विरोधी पक्षनेते मलि्लकार्जुन खरगे व उप राष्ट्रपती जगदीप धकड यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी जेवण केले.

संसेदत मोदी यांच्या जेवणाचे खास नियोजन करण्यात आले होते. जवळपास ४० मिनिटे मोदी तेथे थांबले होते. यावेळी राजकीय मेतभेद सोडून सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. केंद्रीय शेतीमंत्री नरेंद्र तोमर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा व अन्य नेते उपस्थित होते.

- Advertisement -

जेवणात खास करुन बाजरी, नाचणीचे पदार्थ होते. बाजरीची खीर व केकही होता. त्यासोबत ज्वारी, बाजरी व नाचणीची भाकरी होती. हळदीची भाजी होती.

या भोजनाआधी भाजप मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मोदी यांनी २०२३ वर्ष हे बाजरी वर्ष म्हणून साजरे करण्यावर भर दिला. तसेच बाजरीबाबत सुरु असलेल्या पोषण अभियानाला अधिक तीव्र करण्याच्या सुचना मोदी यांनी दिल्या. २०२३ वर्ष हे बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाईल याची माहिती मोदी यांनी ट्विटरवरुनही दिली होती.

- Advertisement -

संसदेतील खास भोजनाबाबत राज्य शेतीमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की, या भोजनासाठी ज्वारी व बाजरीचे पदार्थ बनविण्यात आले होते. त्यासाठी कर्नाटकहून खास शेफला बोलवण्यात आले होते.

केंद्र सरकारने एप्रिल २०१८ मध्ये बाजरीचा पोषण आहारांच्या यादीत समावेश केला. सरकारच्या पोषण मिशनमध्येही बाजरीला स्थान देण्यात आले. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन अंतर्गत १४ राज्यातील २१२ जिल्ह्यांमध्ये बाजरीला पौष्टीक आहारमध्ये स्थान देण्यात आले आहे. आशिया व अफ्रिका खंडातील देशांमध्ये बाजरीची शेती प्रमुख्याने केली जाते. भारत व नायझेरीयासारख्या देशांमध्ये बाजरीची शेती अधिक केली जाते.

भारतात एक किंवा अनेक बाजरीची पिके घेतली जातात. ज्वारी व नाचणीची शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते. २०२०-२१ या वर्षात १८ मिलियन टन बाजरीची शेती केली गेली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -