घरदेश-विदेश'मोदी गो बॅक', आंध्रात जोरदार नारेबाजी!

‘मोदी गो बॅक’, आंध्रात जोरदार नारेबाजी!

Subscribe

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून विजयवाडा, गुंटूर परिसरात ‘मोदी, गो बॅक’च्या घोषणा देत मोर्चे काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान ‘मोदी गो बॅक’ अशी जोरदार नारेबाजी करण्यात आली.  ‘तेलगू देसम’ या आंध्रातील स्थानिक पक्षाकडून ‘मोदी गो बॅक’ असे नारे देण्यात आले. ‘आंध्रप्रदेशचे विभाजन झाल्यानंतर मोदी सरकारने आंध्रप्रदेशवर घोर अन्याय केला आहे’, अशा घोषणा देत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमने हे ‘मोदी गो बॅक’ आंदोलन छेडले होते. भाजपप्रणीत एनडीएतून तेलगू देसम पक्ष बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आले होते. दौऱ्यादरम्यान झालेल्या भाषणात मोदी यांनी चंद्राबाबू नायडू ‘पाठीत खंजीर खुपसण्यात माहीर आहेत’, अशी टीकाही केली होती. याशिवाय त्यांनी तेलगू देसम पक्ष आणि नायडू यांच्यावर अनेकविध आरोपही केले. यालाच विरोध म्हणून टीडीएसने काल राज्यभरात आंदोलन केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून विजयवाडा, गुंटूर परिसरात ‘मोदी, गो बॅक’च्या घोषणा देत मोर्चे काढले.

प्रोटोकॉलला दिला छेद

सहसा देशाचे पंतप्रधान ज्यावेळी एखाद्या राज्यात जातात तेव्हा तिथले सरकार कोणाचेही असो, प्रोटोकॉलनुसार (राजशिष्टाटाराचा) भाग म्हणून एखाद्या मंत्र्याला पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जावे लागते. मात्र, ज्यावेळी मोदी विजयवाडाच्या गन्नावरम विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सरकारमधील एकही मंत्री तिथे उपस्थित नव्हती. मोदी विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांचे भाजप नेत्यांकडूनच स्वागत झाले आणि त्यानंतर ते हेलिकॉप्टरने गुंटूरकडे रवाना झाले.

- Advertisement -

पाळला ‘काळा दिवस’

‘आंध्र प्रदेशच्या विभाजनानंत राज्याला दिलेली आश्वासने मोदी सरकारने पाळली नाहीत’, असं म्हणत त्याविरोधात काँग्रेसने ‘काळा दिवस’ पाळला. तर दुसरीकडे सीपीआय आणि सीपीआय (एम) या दोन्ही डाव्या पक्षांनीही पंतप्रधान मोदी यांच्या आंध्रच्या दौऱ्यावेळी आंदोलन केले. दरम्यान, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वासघातकी आहेत. ते आता आंध्रवर चढाई करण्यासाठी आणि राज्यातील जनतेची चेष्टा करण्यासाठी आले आहेत. मोदी सरकारने आमच्या राज्यावर केलेल्या अन्याय केला असून, देशाच्या व्यवस्थेचाही त्यांनी विध्वंस केला आहे आणि त्यामुळेच ठिकठिकाणी लोकांना आंदोलने करावी लागत आहेत’, अशी प्रतिक्रिया आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -